शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरावर बुलडोझर कारवाई, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 15:46 IST

संभल हिंसाचाराप्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्यावरही गुन्हा दाखल आहे.

UP Sambhal :उत्तर प्रदेशातील संभलम हिंसाचार आणि वीजचोरी प्रकरणात सहभागी असलेले समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्याविरोधात कारवाई तीव्र झाली आहे. त्यांनी केलेल्या अतिक्रमणावरही प्रशासनाने कारवाई सुरू केली असून, महापालिकेच्या पथकाने भुर्के यांच्या घराबाहेरील नाल्यावर बांधलेल्या अवैध पायऱ्याही बुलडोझरच्या सहाय्याने तोडल्या आहेत. 

खासदार बुर्केयांना 1.91 कोटींचा दंडसंभलमधील समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्यावरही वीज चोरीचा आरोप आहे. वीजचोरीप्रकरणी वीज विभागाने त्यांना 1 कोटी 91 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय वीज विभागाने त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. एवढेच नाही, तर सपा खासदार भुर्के यांच्या घराची वीजही खंडित करण्यात आली आहे.

वीज विभागाचे एसडीओ संतोष त्रिपाठी यांनी सांगितले की, वीज विभागाच्या पथकाने खासदार भुर्के यांच्या घरी बसवण्यात आलेल्या मीटरचे रीडिंग घेतले असता ते शून्य असल्याचे समोर आले. त्यानंतर विभागाकडून त्यांना नोटीस पाठवली गेली. नोटीस दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत रक्कम जमा न केल्यास विभागाकडून आरसी जारी केली जाईल.

खासदारांच्या वडिलांवर गुन्हावीज विभागाचे पथक छापा टाकण्यासाठी खासदार भुर्के यांच्या घरी पोहोचले असता, वीज कर्मचाऱ्यांना खासदाराचे वडील मामलुक उररहमान बुर्के यांनी धमकावले. आमचे सरकार आल्यावर पाहून घेऊ, असे त्यांनी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. त्यांच्या वक्तव्याबाबत वीज कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून नखासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभल हिंसाचारप्रकरणी खासदारावरही गुन्हा दाखल24 नोव्हेंबर रोजी संभलमधील शाही जामा मशिदीत सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी एफआयआरमध्ये खासदार भुर्के यांचे नाव देखील समाविष्ट केले आहे. पोलिसांचा आरोप आहे की, बर्के यांनी भडकाऊ भाषणे दिली होती, ज्यामुळे हिंसाचार झाला. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे दोन डझन लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश आहे. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी अडीच हजारांहून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यातील बहुतांश लोक अज्ञात आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ