भाजपा आमदाराच्या कारला धडकली म्हैस; गाडीची पलटी, दुचाकीस्वारही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 05:46 PM2024-01-16T17:46:00+5:302024-01-16T18:05:58+5:30
दुसऱ्या एका अपघातात आमदारच्या कारला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
अहमदाबाद - गुजरातमधील उपलेटा मतदारसंघाचे आमदार डॉ. महेंद्र पडलिया आणि राजकोट जिल्हा भाजपाचे सरचिटणीस रविभाई मकडिया यांच्या कारला भीषण अपघात झाला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दोन्ही नेते एकाच कारमधून जात असताना लिंबडीजवळ एका म्हशीची कारला धडक बसली. त्यामध्ये, आमदार आणि राजकोट जिल्हा भाजप सचिव दोघेही जखमी झाले आहेत. तर, दुसऱ्या एका अपघातात आमदारच्या कारला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
अपघाच्या घटनेची माहिती मिळताच लिंबडीचे आमदार किरीटसिंहजी राणा यांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोन्ही जखमींना पुढील प्राथमिक उपचारासाठी लिंबडी रुग्णालयात हलवले. या दुर्घटनेमुळे नाश झाला या अपघातातील जखमी डॉ. महेंद्र पडालिया यांनी भाजपामध्ये विविध पदांवर काम केलं आहे.
दुसऱ्या आमदाराचा अपघात
दुसर्या प्रकरणात, सोमवारी धारीचे आमदार जे.व्ही. काकडिया यांच्या कारची दुचाकीला धडक बसल्याने अपघात झाला. आमदार जे.व्ही.काकडिया यांचे कुटुंबातील सदस्याचे लग्न असल्याने त्यांनी चालला येथून सात ते आठ गाड्यांच्या ताफ्यासह धारी येथील जवळच्या रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी निघाले होते. काकडीया यांची कार परबडीजवळ आली असता दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात सावरकुंडला येथील कर्जळा गावातील किशन मुकेशभाई राठोड नावाचा तरुण जखमी झाला. किशनची पत्नी धारी येथे मावशीच्या घरी गेली असता, हा तरुण तिला भेटण्यासाठी जात होता.
दरम्यान, आमदार जे.व्ही.काकडिया यांनी सांगितले की, अपघात झाला तेव्हा ते गाडीच्या मागे होते आणि जखमी तरुणाला घटनास्थळावरून त्याच्या चालकासह तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.