शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात योजनांना कात्री?

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

जिल्हा परिषद : स्वयंरोजगार कसा उपलब्ध होणार?नागपूर : ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची साधने निर्माण व्हावी, तसेच शेतीला जोडधंदा म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणारी गाय व शेळी गट वाटपाची योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विभागाच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात या योजनेला कात्री लागणार आहे. २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात या वैयक्तिक लाभाच्या ...


जिल्हा परिषद : स्वयंरोजगार कसा उपलब्ध होणार?
नागपूर : ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची साधने निर्माण व्हावी, तसेच शेतीला जोडधंदा म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणारी गाय व शेळी गट वाटपाची योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विभागाच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात या योजनेला कात्री लागणार आहे.
२०१४-१५ च्या अर्थसंकल्पात या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली होती. परंतु पुढील वर्षासाठी १०० रुपयाची टोकन तरतूद दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
नापिकी व कर्जामुळे विदर्भातील आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाही. यातून सावरण्यासाठी त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याची गरज आहे. या हेतूने गाय व शेळी गट वाटप योजना राबविण्यात येते परंतु लेखा परीक्षकांनी या योजनेच्या अंमलबजावणीवर आक्षेप नोंदविले होते. योजनेतील त्रुटी दूर करून ही योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज होती. परंतु त्रुुटी दूर न करता ही योजनाच बंद करण्याचा प्रयत्न आहे.
पशुसंवर्धन विभागाने १.२८ कोटीचे नियोजन केले आहे. यात सुधारित वैरण, वंधत्व निवारण, दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न, प्रथमोपचार, जीवनसत्व पुरवठा, पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरुस्ती व विविध योजनांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)
चौकट...
निधी वाढला पण तरतूद नाही
२०१४-१५ या वर्षात ९४ लाखांची तरतूद करण्यात आली होती. पुढील वर्षासाठी १.२९ कोटींचे नियोजन केले आहे. परंतु शेळी व गाय गट वाटपासाठी तरतूद करण्यात आलेली नाही. इतर विभागाच्याही वैयक्तिक लाभाच्या योजनांना कात्री लावण्यात आल्याची माहिती आहे.