अंदाजपत्रक मंजुरीअभावी रखडले; विद्यार्थ्यांचे गणवेश शिक्षण मंडळ : खुल्या संवर्गातील विद्यार्थी वंचित

By Admin | Updated: July 29, 2015 01:18 IST2015-07-29T00:42:32+5:302015-07-29T01:18:00+5:30

नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक अद्याप महासभेने मंजूर केले नसल्याने शिक्षण मंडळाच्याही अंदाजपत्रकाला ब्रेक लागला असून त्यामुळे महापालिका शाळांमधील खुल्या संवर्गातील तसेच इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी अद्याप गणवेशाचे वाटप होऊ शकलेले नाही.

Budget deferred due to sanction; Uniform Education Board of the students: Disadvantaged students of open classes | अंदाजपत्रक मंजुरीअभावी रखडले; विद्यार्थ्यांचे गणवेश शिक्षण मंडळ : खुल्या संवर्गातील विद्यार्थी वंचित

अंदाजपत्रक मंजुरीअभावी रखडले; विद्यार्थ्यांचे गणवेश शिक्षण मंडळ : खुल्या संवर्गातील विद्यार्थी वंचित

नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक अद्याप महासभेने मंजूर केले नसल्याने शिक्षण मंडळाच्याही अंदाजपत्रकाला ब्रेक लागला असून त्यामुळे महापालिका शाळांमधील खुल्या संवर्गातील तसेच इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी अद्याप गणवेशाचे वाटप होऊ शकलेले नाही.
महापालिका आयुक्तांनी २० फेबु्रवारीला सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे १४३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. तब्बल पाच महिन्यांच्या विलंबानंतर स्थायीने अंदाजपत्रकात ३३२ कोटींची वाढ सुचवत ते महासभेवर सादर करण्याची तयारी चालविली आहे. याच अंदाजपत्रकात मनपा शिक्षण मंडळाचेही ६१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. शिक्षण मंडळाच्या मंजूर अंदाजपत्रकात पन्नास टक्के निधी शासनाकडून तर पन्नास टक्के निधी महापालिकेकडून दिला जात असतो. महापालिकेचे अंदाजपत्रक अद्याप महासभेवर मंजुरीसाठी न आल्याने शिक्षण मंडळाचेही अंदाजपत्रक रखडले आहे. महापालिकेच्या १२७ शाळांमध्ये सुमारे ३६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यातील मागासवर्गीय विद्यार्थी व मुलींना सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत शासनाकडूनच मिळणार्‍या निधीतून गणवेशांचे वाटप करण्यात आले आहे; मात्र विद्यार्थीवर्गात भेदाची भावना निर्माण होऊ नये यासाठी खुल्या तसेच इतर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार आहेत. परंतु एकीकडे सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झाले असताना खुल्या व इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण मंडळाच्या रखडलेल्या अंदाजपत्रकामुळे गणवेशाचे वाटप होऊ शकलेले नाही. त्यामुळे सदर विद्यार्थी शाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी गणवेशापासून वंचित आहेत.
इन्फो
महापालिकेच्या शाळांमधील खुल्या व इतर मागासवर्गीय गटातील विद्यार्थी वगळता अन्य संवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत करण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनाही गणवेशाचे वाटप करण्यात येणार असून अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर तातडीने सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना गणवेश तातडीने उपलब्ध करून दिले जातील.
- दत्तात्रेय गोतीसे, उपआयुक्त, मनपा

Web Title: Budget deferred due to sanction; Uniform Education Board of the students: Disadvantaged students of open classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.