Budget 2025: बजेट भाषणापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले; अखिलेश यादवांना चांगलेच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:09 IST2025-02-01T12:08:23+5:302025-02-01T12:09:24+5:30

निर्मला सीतारामन बजेट भाषणासाठी तयार होत्या, परंतु विरोधकांना बजेटपूर्वी काही मुद्द्यांवर चर्चा हवी होती. मात्र सभागृहात बोलू न दिल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. 

Budget 2025: Lok Sabha Speaker Om Birla gets angry on Akhilesh Yadav before nirmala sitharaman budget speech; | Budget 2025: बजेट भाषणापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले; अखिलेश यादवांना चांगलेच सुनावले

Budget 2025: बजेट भाषणापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले; अखिलेश यादवांना चांगलेच सुनावले

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र अर्थमंत्री सकाळी ११ वाजता लोकसभा सभागृहात पोहचल्या. त्यानंतर बजेट सादर करणार त्याआधीच विरोधकांकडून गोंधळाला सुरूवात झाली. विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. विरोधकांच्या या गदारोळात सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेदेखील सहभागी होते. अखिलेश यांच्या वर्तवणुकीमुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला चांगलेच संतापले. 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अखिलेश यादव यांना अर्थसंकल्प परंपरेची आठवण करून कधीही बजेटच्या वेळी अशाप्रकारे गोंधळ झाला नाही. तुम्ही जे करताय ते योग्य नाही. अखिलेशजी, मी तुम्हाला संधी देतो, परंतु अशाप्रकारे गोंधळ करू नका असं सांगितले. निर्मला सीतारामन बजेट भाषणासाठी तयार होत्या, परंतु विरोधकांना बजेटपूर्वी काही मुद्द्यांवर चर्चा हवी होती. मात्र सभागृहात बोलू न दिल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. 

सभागृहात जाण्याआधी अखिलेश यादव काय म्हणाले होते?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार होत्या. संपूर्ण देशाचे लक्ष आजच्या बजेटकडे लागले होते. परंतु संसदेत सभागृहात जाण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी स्पष्ट सांगितले की, सभागृहात आम्ही महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा मुद्दा उचलून धरणार आहोत, त्यामुळे अर्थमंत्र्‍यांनी भाषणाला सुरुवात करताच विरोधकांकडून या मुद्द्यांवरून घोषणाबाजी सुरू झाली. त्यात लोकसभेत गोंधळ झाला. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना तुम्ही जे करताय ते योग्य नाही, तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल परंतु बजेट भाषणात व्यत्यय आणू नका असं सांगत खाली बसण्यास सांगितले. मात्र तरीही गोंधळ थांबला नाही. 

दरम्यान, या गोंधळात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात विरोधकांनी बजेटवर बहिष्कार टाकला. विरोधी खासदारांनी सभागृहातून वॉक आऊट केले. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यांच्या जागेवरच बसले होते. बजेट भाषणाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळाने विरोधी बाकांवरील खासदार पुन्हा सभागृहात आले आणि शांतपणे बजेट ऐकत होते. 

Web Title: Budget 2025: Lok Sabha Speaker Om Birla gets angry on Akhilesh Yadav before nirmala sitharaman budget speech;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.