शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

एकीकडे मंदी, नोकऱ्या जातायत; दुसरीकडे अर्थसंकल्पात काय मिळणार?, देशाचं लागलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 8:48 AM

Budget 2023: अर्थसंकल्पातून आज विविध क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

नवी दिल्ली: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करतील. जगभरात मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून नोकरकपातीचा धडाका लावला आहे. भारताच्या उंबरठ्यावर मंदीचे ढग जमू शकतात, असा कयास बांधला जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाजूने कौल देत दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पातून आज विविध क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे, सकाळी अकरा वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प मांडतील. पायाभूत सुविधांना अधिक निधी उपलब्ध करून देण्यावर आणि इमारती आणि रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी वाढविण्यासाठी तसेच रुग्णालयातील कामकाजाची क्षमता वाढवण्याची शक्यता अर्थ वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. तसेच जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात काय-काय असणार आहे. 

राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी यंदा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला.  यात चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) देशाची अर्थव्यवस्था ६ ते ६.८%नी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशात शेअर बाजाराची वाढ वेगाने होत आहे. ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात वाढत्या गुंतवणुकीमुळे बाजार ३.९% इतक्या दराने वाढत आहे. या बाबतीत भारत इतर अनेक देशांना मात देईल असे दिसत आहे. 

कोरोनाच्या २ वर्षांनंतर घरांच्या किमतींत वाढ

कोविड-१९ साथीच्या २ वर्षांच्या काळात घरांच्या किमतींत मंदी होती. या किमती आता वाढू लागल्या आहेत. मागणी वाढल्यामुळे पडून असलेल्या घरांची संख्या कमी झाली आहे. गृहकर्जांचा व्याज दर वाढलेला असतानाही घरांची विक्री वाढली आहे. 

दरवर्षी एक काेटी ई-वाहनांची हाेणार विक्री

देशात २०३० पर्यंत ई-वाहनांची बाजारपेठ माेठी झेप घेणार असून दरवर्षी १ काेटी ई-वाहनांची विक्री हाेणार असल्याचा अंदाज आहे. यात ५ काेटींहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राेजगार निर्माण हाेण्याची अपेक्षा आहे. हे क्षेत्र दरवर्षी ४९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

कृषी क्षेत्राची कामगिरी चांगली, नवी दिशा हवी

कृषी क्षेत्राने यंदा चांगली कामगिरी केली. हवामान बदलाचा प्रतिकूल प्रभाव आणि शेतीचा वाढता खर्च या पार्श्वभूमीवरनवी दिशा देण्याची गरज आहे. मागील ६ वर्षांत कृषी क्षेत्राचा सरासरी वृद्धीदर ४.६ टक्के राहिला. २०२१-२२ मध्ये निर्यात उच्चांकी ५०.२ अब्ज डॉलरइतकी राहिली.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Economyअर्थव्यवस्थाIndiaभारत