शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Budget 2022 Indian Cryptocurrency Digital Rupee: "अर्थमंत्री मॅडम, एका प्रश्नाचं उत्तर द्या..."; काँग्रेसच्या रणदीप सुरजेवालांनी निर्मला सीतारामन यांना विचारला कात्रीत पकडणारा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:58 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाबाबत अपेक्षेप्रमाणे मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

Budget 2022 Indian Cryptocurrency Digital Rupee: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाबाबत अपेक्षेप्रमाणे मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. आतापर्यंत क्रिप्टोकरन्सीबाबत कठोर धोरण राबवत विरोध दर्शवणाऱ्या भारत सरकारने आगामी काळात 'डीजिटल रूपी' ही डिजिटल करन्सी व्यवहारात आणण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर भाजपाच्या काही नेतेमंडळींना हा आत्मनिर्भर भारताचा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हंटलं, पण काँग्रेसने प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र अर्थमंत्री सीतारामन यांना कात्रीत पकडणारा एक सवाल केला.

तुम्ही क्रिप्टो करन्सीवरवर कर लावला आहे. याचा अर्थ असा धरायचा का की क्रिप्टो करन्सी बिल संसदेत न आणताच क्रिप्टो चलनाला आता कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे? जर तसं असेल तर मग या संदर्भातील नियामावली काय आहे? क्रिप्टो चलनाच्या व्यवहाराचे (Exchange) नियमन कसं केलं जाणार आहे? आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गुंतवणूकदारांच्या संरक्षणाबाबतची योजना काय?, असे सवाल विचारत सुरजेवाला यांनी अर्थमंत्र्याना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.

क्रिप्टोकरन्सीबद्दल अर्थसंकल्पात काय आहेत योजना?

क्रिप्टोकरन्सी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी डिजिटल रूपी नावाची डिजिटल करन्सी लवकरच चलनात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. विदेशी क्रिप्टोकरन्सीला पर्याय म्हणून डिजिटल रूपी चलनात येणार आहे. तसेच डिजिटल करन्सीच्या गुंतवणुकीवर ३० टक्के कर लावण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये क्रिप्टोकरन्सीबद्दल उदासीन असलेलं भारत सरकार आता विना विधेयक क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता देतंय का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Budgetअर्थसंकल्प 2022nirmala sitharamanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेस