शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

budget 2021 : करसवलती की करभार? आज अर्थसंकल्प; अर्थव्यवस्थेला आर्थिक लसीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 7:31 AM

budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

नवी दिल्ली -  कोरोनामुळे खंक झालेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी रोजगारनिर्मितीला चालना देण्याबरोबरच सामान्यांना प्राप्तिकरात सवलती, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ, आरोग्य क्षेत्राला उभारी, उद्योगांना भरघोस सवलती इत्यादींसाठी सर्वंकष तरतुदी करण्याची आवश्यकता भासणार असून आज, १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून याच अपेक्षा असतील.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनाच्या महासाथीने आपली गडद छाया अर्थव्यवस्थेवर सोडली आहे. टाळेबंदीने आक्रसलेला रोजगाराचा बाजार आर्थिक लसीच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनीची अपेक्षा आहे. आरोग्य क्षेत्रही बूस्टरच्या अपेक्षेत आहे.  तर उद्योगांना सवलतींची आवश्यकता आहे. इंधनदर रोज नवे विक्रम स्थापित करत असल्याने महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

निर्गुंतवणुकीतून २ लाख कोटी उभारण्याचे लक्ष्यसरकारी उपक्रमातील सार्वजनिक कंपन्यांमधून निर्गुंतवणूक करत त्यातून २ लाख कोटी रुपये महसूल उभारण्याचा सरकारचा मानस आहे. त्यातून मिळालेल्या पैशांतून पायाभूत सुविधांवर भर देऊन रोजगार निर्मितीला चालना दिली जाईल, असाही अंदाज अर्थतज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. शेती क्षेत्रालाही अपेक्षाशेतीविषयक कायद्यांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी नेमकी किती तरतूद केली जाते, याकडे संपूर्ण देशाचेच लक्ष असेल.नवे रोजगार निर्माण करण्याची चिंता कोरोनापाठोपाठ आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या रोजगारांवर संक्रांत आली आहे. लाखो कामगारांच्या वेतनात मोठी कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत प्राप्तिकरात सवलती मिळतात किंवा कसे, याकडे करदात्यांचे लक्ष असेल. संरक्षणावरील खर्चातही वाढ?गेल्या आठ महिन्यांनापासून लडाख तसेच इतर सीमा भागांवर ठाण मांडून बसलेले चिनी लष्कर आणि पाकिस्तानचा वाढता उपद्रव, हे पाहता अर्थसंकल्पात संरक्षणावरही मोठी तरतूद असणे अपेक्षित आहे. 

तारेवरची कसरतएकूणच घटलेला महसूल, कोरोनाकहरामुळे बुडालेले रोजगार, आरोग्य क्षेत्रावर पडलेला ताण या सर्वांवर मात करण्यासाठी करसवलती द्यायच्या की, महसूल वाढीसाठी सामान्यांवर करभार वाढवायचा, याचा सांगोपांग विचार करून तशा पद्धतीचा अर्थसंकल्प देशापुढे सादर करण्याचे आव्हान अर्थमंत्री सीतारामन यांच्यापुढे आहे.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारत