शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बजेटच्या दिवशी राहुल गांधींकडून मोदींना धोबीपछाड; पंतप्रधान थेट चौथ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 12:50 IST

सोशल मीडियावर राहुल गांधींनी मोदींना टाकलं मागे

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. 2014 प्रमाणेच या निवडणुकीतही सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी सोशल मीडियासाठी वेगळी रणनिती आखली. गेल्या निवडणुकीत भाजपानं मोठ्या खुबीनं सोशल मीडियाचा वापर केला होता. मात्र आता काँग्रेसनंही सोशल मीडियावर जोरदार मुसंडी मारली. मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी हे दिसून आलं. 1 फेब्रुवारीला काँग्रेस अध्यक्ष राहुल अध्यक्ष ट्विटरवर बाजी मारली. विशेष म्हणजे राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, पंतप्रधान कार्यालय यांनाही मागे टाकलं.1 फेब्रुवारीला अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी राहुल गांधींनी केलेलं ट्विट पहिल्या क्रमांकावर होतं. मोदी सरकारनं शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची मदत देणारी योजना सुरू करण्याची घोषणा केली. यावर राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सडकून टीका केली. राहुल यांचं ट्विट जवळपास 13 हजार जणांनी रिट्विट केलं. या बाबतीत नरेंद्र मोदींचं ट्विट चौथ्या, तर पीएमओचं ट्विट पाचव्या क्रमांकावर होतं. विशेष म्हणजे ट्विटरवरील मोदींच्या फॉलोअर्सची संख्या राहुल यांच्या फॉलोअर्सच्या तुलनेत पाचपट आहे. राहुल गांधींच्या या ट्विटला भाजपानं प्रत्युत्तर दिलं. मात्र त्या ट्विटला 9 हजार रिट्विट मिळू शकले. त्यामुळे हे ट्विट 1 फेब्रुवारीला दुसऱ्या क्रमांकावर होतं. तर तिसऱ्या स्थानावर एका पत्रकाराचं ट्विट होतं. त्यात मोदी आणि राहुल यांच्या मास्टरस्ट्रोकबद्दल भाष्य करण्यात आलं होतं.  पंतप्रधान मोदींच्या ट्विटला 7500 रिट्विट मिळाल्यानं ते चौथ्या स्थानी होतं. तर पीएमओचं ट्विट 4700 वेळा रिट्विट झालं. गेल्या वर्षभरात राहुल गांधी सोशल मीडियावर अतिशय आक्रमक झाले आहेत. त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन राहुल यांनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटरBudget 2019अर्थसंकल्प 2019BJPभाजपा