शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Budget 2019: 'संरक्षण सामग्रीची प्रक्रिया अधिक वेगाने होणे गरजेचे'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 3:49 AM

अर्थसंकल्पीय रकमेतील मोठी रक्कम सैन्यांचे वेतन व पेन्शनमध्ये जाते. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी पैसा कमी पडतो.

- दत्तात्रय शेकटकरआजच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी तीन लाख कोटींची तरतूद केली आहे. आपल्याकडे संरक्षणदृष्ट्या अनेक वस्तूंची कमतरता आहे. अर्थसंकल्पीय रकमेतील मोठी रक्कम सैन्यांचे वेतन व पेन्शनमध्ये जाते. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी पैसा कमी पडतो.सरकारी यंत्रणेत दोन गोष्टी चुकीच्या आहेत. एक म्हणजे जो पैसा मंजूर झाला आहे, तो त्या ठरावीक वेळेतच खर्च करावा लागतो. पैसा ३१ मार्चपर्यंत न झाल्यास तो सरकारकडे परत जातो. सैन्य सामुग्रीच्या खरेदीचा विचार करता, आज जर मागणीनंतर वस्तू देशात यायला अनेक वर्षे लागतात. यामुळे मंजूर झालेली रक्कम परत न जाता ती सैन्यदलाकडेच राखीव ठेवली जावी, तसेच संरक्षण सामग्रीची खरेदी करण्याची प्रक्रिया ही वेगवान व्हावी. राफेल विमानांचा करार २००७ मध्ये झाला होता. मात्र, अद्यापही ही विमाने आलेली नाहीत. सैन्याच्या आधुनिकीरणासाठी अनेक समित्या स्थापन केल्या. त्यात माझ्या जनरल शेकटकर समितीचाही समावेश आहे. आम्ही अनेक शिफारशी केल्या होत्या. जीडीपीच्या तीन टक्के रक्कम संरक्षणावर खर्च करण्यात यावी, अशी सूचना आम्ही केली होती. असे झाल्यास आपण पाकिस्तान व चीन यांना प्रभावीपणे तोंड देऊ शकतो. मात्र, अद्यापही ही रक्कम मिळत नाही. यावर निर्णय झाल्यास संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत होईल. ‘वन रँक वन पेन्शन’चा अत्यंत संवेदनशील मुद्दा अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न या अर्थसंकल्पात निकाली लागला आहे. यामुळे सैन्य दलात आनंदाचे वातावरण आहे.(लेखक निवृत्त लेफ्टनंट जनरल आहेत)

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Defenceसंरक्षण विभागIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दल