नवी दिल्ली- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सध्याच्या रालोआ सरकारचे शेवटचे पूर्ण बजेट आज मांडले. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये निर्गुंतवणुकीचे 80हजार कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवल्याचे स्पष्ट केले. 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये सरकारने 72 हजार 500 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी त्यामध्ये 10 टक्के वाढ करण्यात आली आहे.सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटस इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या तिन्ही कंपन्यांची एकच कंपनी तयार करण्यात येईल अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केली. सोन्याच्या व्यवहारांसाठी एक व्यापक धोरण आखण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Budget 2018: 2018-19 या वर्षासाठी काय आहे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:16 IST
निर्गुंतवणुकीबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Budget 2018: 2018-19 या वर्षासाठी काय आहे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ?
ठळक मुद्देसार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटस इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या तिन्ही कंपन्यांची एकच कंपनी तयार करण्यात येईल अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केली