शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

लोकसभा निवडणुकीसाठी सपा-बसपाची आघाडी; अखिलेश, मायावतींकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 13:04 IST

एकत्रित पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा; काँग्रेस, भाजपावर सडकून टीका

लखनऊ: लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनं आघाडी केली आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावतींनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली. या पत्रकार परिषदेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांची झोप उडाली असेल, असं मायावती आघाडीची घोषणा केल्यानंतर म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीआधी झालेली ही आघाडी राजकारणात क्रांती घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यातील प्रत्येकी 38 जागा लढवणार असल्याची माहिती मायावतींनी दिली. तर दोन जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. याशिवाय अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये दोन्ही पक्ष उमेदवार देणार नाहीत. काँग्रेससाठी दोन मतदारसंघ सोडणाऱ्या मायावतींनी पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि भाजपावर घणाघाती टीका केली. 'भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यशैलीत फारसा फरक नाही. स्वातंत्र्यानंतर बराच काळ काँग्रेस पक्ष सत्तेत होता. बहुतांश राज्यांमध्ये त्यांची सत्ता होती. त्यांच्या सत्ताकाळात गरिबी आणि भ्रष्टाचार वाढला. या दोन्ही पक्षांची विचारधारा जवळपास सारखीच आहे,' अशी टीका त्यांनी केली.पत्रकारांना संबोधित करताना मायावतींनी बोफोर्स आणि राफेल करारांचा उल्लेख केला. 'दोन्ही पक्षांनी संरक्षण करारांमध्ये घोटाळे केले आहेत. आधी काँग्रेसनं बोफोर्स घोटाळा केला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता लवकरच राफेल घोटाळ्यामुळे भाजपाला सत्ता सोडावी लागेल,' असं मायावती म्हणाल्या. उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये आम्ही एकत्र आलो होतो. त्यावेळी भाजपाचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही भाजपावर सडकून टीका केली. देशात सध्या अराजकतेची परिस्थिती आहे. राज्यातील गरिबी वाढली आहे. भाजपाकडून धर्माच्या नावानं राजकारण केलं जात आहे, असं अखिलेश म्हणाले. मायावतींवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांवर त्यांनी शरसंधान साधलं. 'भाजपा नेते मायावतींवर अशोभनीय शब्दांमध्ये टीका करतात. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. आता मायावतींचा सन्मान हा माझा सन्मान आहे आणि त्यांचा अपमान हा माझा अपमान आहे,' असं अखिलेश यांनी म्हटलं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९mayawatiमायावतीAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीBJPभाजपाcongressकाँग्रेस