शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच देशात वाढतोय जातीयवाद, मायावतींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 14:54 IST

राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने मायावती संतप्त झाल्या आहेत.

नवी दिल्ली - राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने मायावती संतप्त झाल्या आहेत. पक्षाला खिंडार पडल्याने संतप्त झालेल्या मायावती यांनी आज ट्विटरवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसमुळेच देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढत आहेत, असा आरोप मायावती यांनी केला.  आपल्या ट्विटमध्ये मायावती म्हणतात, ''काँग्रेस पक्षाच्या दुटप्पी भूमिकेमुळे देशात जातीयवादी शक्ती मजबूत होत आहेत. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्ष अशा जातीयवादी, सांप्रदायिक शक्तींना कमकुवत करण्याऐवजी त्या शक्तींविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच कमकुवत करण्यात गुंतली आहे. त्यामुळे जनतेने सावध राहिले पाहिजे.''

 तत्पूर्वी, बसपाचे सहा आमदार फुटून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मायावती यांनी मंगळवारी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाच्या सरकारने पुन्हा एकदा बसपाच्या आमदारांना फोडून आपण अविश्वासार्ह आणि दगाबाज पक्ष आहोत हे सिद्ध केले आहे. ही घटना म्हणजे बसपा चळवळीसोबत झालेला विश्वासघात आहे, असा आरोप त्यांनी केला होता. बसपाच्या सहा आमदारांनी केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश राजस्थान विधानसभेतील बहुजन समाज पक्षाचे सर्व सहा आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले असून त्यांनी आपला विधिमंडळ पक्षही सत्ताधारी पक्षात विलीन केला होता. यामुळे काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारचे संख्याबळ १०६ झाले आहेत.बसपच्या या आमदारांनी आपल्या या निर्णयाचे अधिकृत पत्र सोमवारी मध्यरात्री विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी दिले. आधी हे आमदार काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देत होते. सरकारला अधिक स्थैर्य यावे व विकासाला गती मिळावी, यासाठी हे पक्षांतर केल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे.विधानसभेत काँग्रेसला ११९ आमदारांचा पाठिंबा आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोक दलाचा एक तर १३ अपक्षांपैकी १२ आमदारांचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारला पाठिंबा आहे. बसपतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सहा आमदारांमध्ये जोगिंदरसिंह आवना, दीपचंद, राजेंद्रसिंह गुढा, लखनसिंह, वाजिब अली, संदीपकुमार यांचा समावेश आहे. 

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण