BSNL 4G Launch: काय साध्य होणार? लोक 5G वापरणार, अन् सरकारी BSNL फोर जी लाँच करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 02:27 PM2022-02-22T14:27:43+5:302022-02-22T14:31:36+5:30

BSNL 4G Launch after 5G of Private Telecoms: एकीकडे कंपनी आपली 4G कनेक्टिव्हिटी जाहीर करण्याच्या तयारीत असताना, Vodafone Idea, Airtel आणि Reliance Jio सारख्या इतर दूरसंचार कंपन्यांनी देशात 5G कनेक्टिव्हिटी चाचण्या सुरू केल्या आहेत.

BSNL 4G Launch: People will use 5G of Reliance Jio, Vodafone, Airtel and BSNL 4G may launch after that | BSNL 4G Launch: काय साध्य होणार? लोक 5G वापरणार, अन् सरकारी BSNL फोर जी लाँच करणार

BSNL 4G Launch: काय साध्य होणार? लोक 5G वापरणार, अन् सरकारी BSNL फोर जी लाँच करणार

Next

भारत संचार निगम लिमिटेडने टीसीएससोबत करार केला आहे. यानुसार आता भारतात बीएसएनएल फोर जी सेवा लाँच करणार आहे. खासगी कंपन्या फाईव्ह जीची तयारी करत असताना  सरकारी कंपनी नेहमीच लेट प्रमाणे आता फोरजी सेवेत उतरत आहे. कंपनीने अद्याप याची घोषणा केलेली नसली तरी रिपोर्टनुसार BSNL 4G कनेक्टिविटीची घोषणा देशाच्या स्वातंत्र्य दिनावेळी केली जाण्याची शक्यता आहे. 

सध्या बीएसएनएल देशात थ्री जी कनेक्टिव्हीटी पुरविते. ब्रॉडबँड प्लॅन्सही खासगी कंपन्यांपेक्षा महागडे आहेत. फोरजी लाँच केल्यानंतर पुढील वर्षी बीएसएनएल फाईव्हजी कडे वळण्याची शक्यता आहे. बीएसएएनएल देशभरात कमीतकमी १ लाख टेलिकॉम टॉवर उभारणार आहे. 

BSNL कंझ्युमर मोबिलिटी डायरेक्टर सुशील कुमार मिश्रा म्हणाले, "BSNL 4G सेवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सोबत तंत्रज्ञान भागीदार म्हणून देईल. 4G सेवेसाठी भारतीय तंत्रज्ञान / भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ असेल.BSNL ची बिहारमध्ये किमान 4,000 सह देशभरात 1 लाख दूरसंचार टॉवर बांधण्याची योजना आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये 4G सेवा देखील दिली जाणार आहे. 

एकीकडे कंपनी आपली 4G कनेक्टिव्हिटी जाहीर करण्याच्या तयारीत असताना, Vodafone Idea, Airtel आणि Reliance Jio सारख्या इतर दूरसंचार कंपन्यांनी देशात 5G कनेक्टिव्हिटी चाचण्या सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत बीएसएनएल तोट्यात जाणार आहे. यामुळे ही कंपनी इतर सरकारी कंपन्यांसारखी विकायला काढावी लागण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: BSNL 4G Launch: People will use 5G of Reliance Jio, Vodafone, Airtel and BSNL 4G may launch after that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.