मानवी तस्करी रोखण्यासाठी बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 02:57 AM2020-07-06T02:57:27+5:302020-07-06T02:57:53+5:30

कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.

BSF raises vigilance on Indo-Bangladesh border to curb human trafficking | मानवी तस्करी रोखण्यासाठी बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता वाढवली

मानवी तस्करी रोखण्यासाठी बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता वाढवली

Next

दिल्ली/कोलकाता : सुमारे ४,०९६ किलोमीटर लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर मानवी तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सतर्कता वाढवली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मानवी तस्करी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे हा खबरदारीचा उपाय केला जात आहे.
बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.
बीएसएफने १९ ते २९ जून या दोन आठवड्यांच्या कालावधीत पाच बांगलादेशी नागरिकांना रेल्वे डब्यांमधून पकडले होते. ते पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात आले होते. त्यांचे वय १२ ते २५ वर्षे होते. लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्यानंतर या लोकांना आमिष देऊन सीमापार तस्करीच्या माध्यमातून आणले गेले, असे समजले जात आहे. यामुळे बीएसएफने आपल्या सर्व सीमा चौक्यांवर सतर्कता वाढवली आहे.
दिल्लीत बीएसएफच्या एका अधिकाºयाने सांगितले की, या मुद्यावर आम्ही आमचे समकक्ष बीजीबी (बॉर्डर गार्ड बांगलादेश) यांच्याशी समन्वय साधून आहोत. सीमेवर असे प्रकार घडता कामा नयेत, हे पाहणे आमचे काम आहे. याबरोबरच पकडलेल्या गुन्हेगारांची योग्य पद्धतीने चौकशीही केली जात आहे. बीएसएफ व बीजीबीचे सध्या चांगले संबंध आहेत. काही ठिकाणी संयुक्त गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दोन्ही देशांचे सीमा रक्षक दल आपापल्या गुप्तचरांच्या माहितीची देवाण-घेवाण करीत आहे.
दक्षिण बंगालला लागून असलेली ९१३ किलोमीटरची सीमा अधिक संवेदनशील समजली जाते. या सीमेवर बहुतांश गुन्हे घडतात. यात मानवी तस्करी, पाळीव प्राण्यांची तस्करी, अंमलीपदार्थांची तस्करी, कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून अनेक ठिकाणी माणसांना बेकायदेशीररीत्या भारतात
पाठवण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.

प्राण्यांच्या तस्करीसाठी नवनवीन पद्धती

मान्सूनचा काळ व नद्यांना आलेले अफाट पाणी याद्वारेही भारतातून बांगलादेशात पाळीव प्राण्यांची तस्करी केली जाते.
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात असा प्रकार प्रथमच उघडकीस आला. एका सांगाड्यात लपवून जिवंत बछड्याची तस्करी केली जात असताना पकडले होते.
केळीच्या खांबांचा तराफा बनवून त्याला बांधून प्राण्यांची तस्करी केली जाते. असे प्रकार अनेक वेळा उघडकीस आले आहेत.
नदीतून होणारी तस्करी टाळण्यासाठी सीमा सुरक्षा दल बोटद्वारे
गस्त घालत आहे.
तसेच सीमेवर मोठमोठे खड्डे खोदले जात
आहेत.

सीमेवरील गुन्हे रोखण्यासाठी गस्त घालणाºया जवानांची गुन्हेगारांशी चकमक होऊन जानेवारी २०१८ ते जून २०२० या कालावधीत २०० पेक्षा अधिक जवान जखमी झालेले आहेत.

 

Web Title: BSF raises vigilance on Indo-Bangladesh border to curb human trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.