शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहिद वडिलांना लेकाचा सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 19:59 IST

शहीद बीएसएफ सब-इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांचं पार्थिव त्यांचा मुलगा इमरान रझा याच्याकडे सोपवण्यात आलं, तेव्हा तिथे असलेले सर्वच जण भावुक झालेले पाहायला मिळाले.

पाटणा विमानतळावर सोमवारी शहीद बीएसएफ सब-इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांचं पार्थिव त्यांचा मुलगा इमरान रझा याच्याकडे सोपवण्यात आलं, तेव्हा तिथे असलेले सर्वच जण भावुक झालेले पाहायला मिळाले. जम्मू आणि काश्मीरमधील आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी गोळीबारात जखमी झाल्यानंतर इम्तियाज शहीद झाले.

"मला माझ्या वडिलांचा अभिमान"

"मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. देशासाठी आपलं बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना मी सलाम करतो" असं माध्यमांशी बोलताना इमरानने म्हटलं आहे. त्याने सांगितलं की, तो त्याच्या वडिलांशी १० मे रोजी सकाळी ५:३० वाजता शेवटचा बोलला होता. त्यावेळी त्यांच्या उजव्या पायाला गोळी लागली होती. त्याच संध्याकाळी ते शहीद झाल्याची माहिती मिळाली.

"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

"पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं"

मोहम्मद इम्तियाज यांचा मुलगा इमराने सरकारकडे पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची मागणी केली. "आपल्या सरकारने असं चोख प्रत्युत्तर द्यायला पाहिजे की दुसऱ्या कोणत्याही मुलाला त्याचे वडील गमवावे लागू नयेत. आता पाकिस्तानला धडा शिकवणे गरजेचं आहे" असंही इमरानने म्हटलं आहे. 

पाटणा विमानतळावर देण्यात आला गार्ड ऑफ ऑनर 

पाटणा विमानतळावर शहीद जवानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आणि श्रद्धांजली समारंभही आयोजित करण्यात आला. यानंतर, पार्थिव सारण जिल्ह्यातील नारायणपूर गावात नेण्यात आलं. श्रद्धांजली वाहण्यासाठी विमानतळावर अनेक राजकारणी आणि अधिकारी उपस्थित होते. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, दिलीप जयस्वाल, ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

"शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा

तेजस्वी यादव म्हणाले की, "शहीद इम्तियाज यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना आपला जीव गमावला आहे. आज आपण सुरक्षित आहोत कारण असे शूर जवान आपलं रक्षण करतात. देश त्यांचं बलिदान कधीही विसरणार नाही." ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार यांनी शहीद मोहम्मद इम्तियाज यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. आपल्या जवानांनी त्यांच्या बलिदानाचा बदला घेतला आहे असं म्हटलं.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी