भारतीय हद्दीत घुसणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला BSFने पकडले; पंजाब पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 08:06 IST2024-02-17T08:02:53+5:302024-02-17T08:06:03+5:30
भारतीय सुरक्षा दलांनी देशाच्या सीमेत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

भारतीय हद्दीत घुसणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला BSFने पकडले; पंजाब पोलिसांनी घेतले ताब्यात
नवी दिल्ली: भारतीय सुरक्षा दलांनी देशाच्या सीमेत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. बीएसएफच्या जवानांनी शुक्रवारी एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. सुरक्षा दलांनी सांगितले की, हा पाकिस्तानी नागरिक पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील ठाकूरपूर गावाजवळील भारतीय हद्दीत प्रवेश करत होता.
बीएसएफने सांगितले की, शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील ठाकूरपूर गावाजवळ एका पाकिस्तानी नागरिकाला भारतीय हद्दीत प्रवेश करताना पकडण्यात आले. कुंपणाजवळून तो आयबी ओलांडत होता. चौकशीदरम्यान तो नकळत भारतीय हद्दीत घुसल्याचे उघड झाले असून त्याच्याकडून काहीही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद आढळले नाही. यानंतर बीएसएफच्या पथकाने आरोपीला पुढील तपासासाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले.