बहिणीला बलात्कारांपासून वाचवायला गेला, पण नराधमांनी त्याचाच खून केला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 13:34 IST2018-06-21T13:34:19+5:302018-06-21T13:34:19+5:30
नराधमांनी गळा दाबून त्याचा खून केला.
_201707279.jpg)
बहिणीला बलात्कारांपासून वाचवायला गेला, पण नराधमांनी त्याचाच खून केला!
पटियाला - बलात्काऱ्यांपासून 14 वर्षीय बहिणीला वाचवण्यासाठी धावलेल्या 12 वर्षीय मुलाचा तीन नराधमांनी खून केला. पंजाबमधील पटियाला येथे 15 जून रोजी ही घटना घडली आहे. आज पोलिसांनी याचा खुलासा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी सकाळी 14 वर्षीय मुलीला घरी एकटी पाहून तीन जण बळजबरीने घरात घुसले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या नराधमाच्या तावडीतून आपल्या बहिणीला सोडवण्यासाठी 12 वर्षीय भाऊ धावला. पण त्या नराधमांनी गळा दाबून त्याचा खून केला. बादशाहपुर पोलिस स्टेशनमध्ये तीघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला वैदकिय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात दाखळ करण्यात आले आहे. खून करण्यात आलेल्या 12 वर्षीय मुलाचा पोस्टमार्टम 3 डॉक्टरांच्या पथकानी केला, त्यानंतर त्याच्यावर घरच्यांनी अंतिम संस्कार केले.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी सकाळी बहिणीसोबत सुरु असलेला प्रसंग पाहून मुलाने आरडाओरडा केला. त्यावेळी त्यातील दोघानी त्याचे हात आणि पाय घरले तर तिसऱ्याने गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याच्या गळ्यात ओडणी बांधून त्याला वरती लटकवले आणि पळून गेले होते. पोलिसांनी याप्रकरणी, आरोपी जगराज सिंह, गुरजंट आणि कुलदीप सिंह यांच्या विरोधात कलम 302, 316 गुन्हा दाखल केला आहे.