कृषी विक्रेते व अधिकार्यांनी केली बोगस कापूस बियाणाची होळीे
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:58+5:302015-03-08T00:30:58+5:30
औरंगाबाद : अनिष्ट व वाईट प्रवृत्तीची होळी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे कृषी विक्रेते व कृषी कंपन्यांतील अधिकार्यांनी बोगस कापसाच्या बियाणांची होळी केली. कापसाचा हंगाम जवळ आला असून, महिनाभरात शेतकरी कापूस पिकाच्या लागवडीसाठी बियाणे खरेदीच्या हालचाली सुरू होतील. कापसाचा जिल्हा म्हणून औरंगाबादची महाराष्ट्रात ओळख आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना बियाणे शासन मान्य व अधिकृत विक्रेत्यांकडून प्राप्त झाले पाहिजे. बियाणाच्या व्यवसायात काळाबाजार होऊ नये यासाठी होळीच्या निमित्ताने कृषी विक्रेते व वितरक आणि कृषी कंपनीतील अधिकार्यांनी बोगस बियाणाचे दहन केले.

कृषी विक्रेते व अधिकार्यांनी केली बोगस कापूस बियाणाची होळीे
औ ंगाबाद : अनिष्ट व वाईट प्रवृत्तीची होळी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे कृषी विक्रेते व कृषी कंपन्यांतील अधिकार्यांनी बोगस कापसाच्या बियाणांची होळी केली. कापसाचा हंगाम जवळ आला असून, महिनाभरात शेतकरी कापूस पिकाच्या लागवडीसाठी बियाणे खरेदीच्या हालचाली सुरू होतील. कापसाचा जिल्हा म्हणून औरंगाबादची महाराष्ट्रात ओळख आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना बियाणे शासन मान्य व अधिकृत विक्रेत्यांकडून प्राप्त झाले पाहिजे. बियाणाच्या व्यवसायात काळाबाजार होऊ नये यासाठी होळीच्या निमित्ताने कृषी विक्रेते व वितरक आणि कृषी कंपनीतील अधिकार्यांनी बोगस बियाणाचे दहन केले. होळीचे दहन आपल्याला सत्य किंवा चांगलेपणावर विजय दर्शवितो, त्याचप्रमाणे अप्रमाणित बियाणे किंवा बेकायदेशीर विक्रीचा व्यवसाय जिल्ह्यात होऊ नये म्हणून विविध विक्रेते व वितरक, अधिकार्यांनी एकत्र येऊन बोगस बियाणांचे दहन केले. यावेळी कृषी वितरक व विक्रेता युनियनचे अध्यक्ष राकेश सोनी, संजय बन्सल, दत्ता इथापे यांच्यासह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.