Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 10:37 AM2020-01-01T10:37:06+5:302020-01-01T10:54:51+5:30

काश्मीरमध्ये तब्बल 5 महिन्यांनी एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

broadband internet in government hospitals and sms services restores in kashmir | Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू

Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू

googlenewsNext

श्रीनगर - काश्मीरमध्ये तब्बल 5 महिन्यांनी एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरला नववर्षाची भेट मिळाली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ब्रॉडबँड सेवा तर सर्व मोबाईलवर एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून काश्मीरमधील सर्व परिसरात एसएमएस सुविधा पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच शाळा, कॉलेजमधील इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाईन, इंटरनेट व एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर 5 महिन्यांच्या कालावधीनंतर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारचे प्रवक्ते व योजना विभागाचे प्रमुख सचिव रोहित कंसल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून इंटरनेट सेवा आणि सर्व मोबाईलवर एसएमएस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

नववर्षाच्या सुरुवातीला हे पाऊल उचलण्यात आले आहे. काश्मीरमध्ये अद्यापही इंटरनेट आणि प्रीपेज मोबाईल सेवा सुरू होणं बाकी आहे. या सेवा केव्हा सुरू केल्या जातील याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या सरकार यावर विचार करत आहे. लवकरच इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे. हळूहळू अन्य सरकारी रूग्णालय आणि शाळांमध्येही इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रोहित कंसल यांनी दिली आहे. कलम 370 घटवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकारने खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मोबाईल सेवा बंद केल्या होत्या.

जम्मू काश्मीरमध्ये सुमारे 180 वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. दहशवादी कारवाया आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले होते. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमधून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 2012 मध्ये 3 वेळा, 2013 मध्ये 5 वेळा, 2014 मध्ये 6 वेळा, 2015 मध्ये 14 वेळा, 2016 मध्ये 31 वेळा, 2017 मध्ये 79 वेळा, 2018 मध्ये 134 वेळा आणि 2019 मध्ये 95 वेळा इंटरनेट बंद ठेवण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमधील दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून, सरत्या वर्षामध्ये काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. तसेच दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. यासंदर्भातील माहिती जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली आहे.

सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे उच्चाटन करण्यात येत असलेल्या यशाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, ''काश्मीर खोऱ्यामध्ये दीर्घकाळापासून सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. काश्मीरमधील सक्रिय दहशतवाद्यांचा आकडा 300 वरून 250 पर्यंत खाली आला आहे.'

 

Web Title: broadband internet in government hospitals and sms services restores in kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.