शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:52 IST

भारताकडे अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे जी आमच्या स्टील्थ टेक्निकच्या विमानांनाही अलगद हेरू शकते. काही सेकंदात  F-35B लढाऊ विमान ट्रॅक झाल्याने आतापर्यंत लपवून हेरगिरी करत असलेल्या या देशांच्या संरक्षण दलांत खळबळ उडाली आहे.

अमेरिकन मेड ब्रिटनचे F-35B हे स्टील्थ लढाऊ विमान केरळमध्ये उतरले आणि अमेरिकेलाच नाही तर चीनलाही धडकी भरली आहे. स्टील्थ म्हणजे रडारही ज्या विमानाला पकडू शकत नाही असे तंत्रज्ञान यामध्ये असते. परंतू भारतीय हवाई दलाने हे विमान केरळच्या दिशेने येत असल्याचे आधीच पकडले होते. ब्रिटीश रॉयल नेव्हीच्या या विमानाने भारतीय हवाई दलाला हे विमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरू देण्याची विनंती केली होती. ती भारताने मान्य केली. याबद्दल ब्रिटनने भारताचे आभार मानले आहेत, परंतू खरी खळबळ अमेरिकेसह चीनमध्ये उडाली आहे. 

भारताकडे अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे जी आमच्या स्टील्थ टेक्निकच्या विमानांनाही अलगद हेरू शकते. काही सेकंदात  F-35B लढाऊ विमान ट्रॅक झाल्याने आतापर्यंत लपवून हेरगिरी करत असलेल्या या देशांच्या संरक्षण दलांत खळबळ उडाली आहे. अमेरिकेला लाजिरवाणे वाटू लागले असून चीनलाही भारत आपली लढाऊ विमाने तर ट्रॅक करू शकणार तर नाही ना याची भीती वाटू लागली आहे. 

अमेरिका या विमानाला पाचव्या पिढीचे स्टील्थ फायटर जेट म्हणून विकत आहे. जगातील अशी कोणतीही रडार सिस्टीम नाही जी या विमानाला पकडू शकते, असा अमेरिकेचा दावा आहे. होता. तो आता भारतीय हवाई दल आणि डीआरडीओने फोल ठरविला आहे. F-35B लढाऊ विमान त्याच्या लपून राहण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात होते. रडारला फसवू शकते आणि ते सहजासहजी शोधता येत नाही. परंतू, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ज्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानसोबत तुर्की आणि चीनचे कंबरडे मोडले त्याच एकात्मिक हवाई कमांड आणि नियंत्रण प्रणालीने (IACCS)ने जगाचे डोळे विस्फारूनच ठेवले आहेत. 

IACCS हे एक नेटवर्क आहे ज्यामध्ये अनेक सेन्सर, रडार आणि नियंत्रण केंद्रे समाविष्ट आहेत. या एकत्रित सिस्टीममुळे अमेरिकेचे हे लढाऊ विमान पकडले गेले आहे. ब्रिटीश नेव्हीचे हे विमान नेहमीच्या सरावासाठी झेपावले होते. ब्रिटन काही भारताचा सध्याचा दुश्मन नाहीय. परंतू, तेव्हा भारत-पाकिस्तानमध्ये तणाव होता. अशावेळी हे लढाऊ विमान भारताच्या दक्षिण बाजुला काय करत होते, असाही प्रश्न उपस्थित होत होता. तरीही भारतीय हवाई दलाने तातडीने हालचाली करत हे विमान केरळमध्ये उतरू दिले. इंधन भरले आणि उड्डाणासाठी देखील प्रयत्न केले. एअर इंडियाने आपला हँगर देखील देऊ केला होता. सुरवातीला ब्रिटनने नाकारला नंतर मात्र त्यांनी हे विमान हँगरमध्ये हलविले.

टॅग्स :Americaअमेरिकाfighter jetलढाऊ विमानchinaचीनindian air forceभारतीय हवाई दल