शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

"जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत भाजपाला बंगालमध्ये येऊ देणार नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 17:47 IST

West Bengal Assembly Election 2021 : भाजपाला सत्तेत आणणे म्हणजे दंगली वाढविण्यासारखे आहे, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

ठळक मुद्देभाजपा खोटी आश्वसने देत आहे. शेतकऱ्यांना पैसे देत नाही, असा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला होता.

कोलकाता : पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पार्टी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. भाजपाला सत्तेत आणणे म्हणजे दंगली वाढविण्यासारखे आहे, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भाजपावर हल्लाबोल केला आहे. (Mamata Banerjee Mocks BJP's Roadshow Politics)

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर भाजपाला नक्कीच मतदान करा. मात्र, तुम्ही ममता बॅनर्जीला पराभूत करु शकत नाही, कारण, ती एकटी नाही. तिला लोकांचा पाठिंबा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी भाजपाला येथे येऊ देणार नाही."

याचबरोबर, मंगळवारी भाजपा खोटी आश्वसने देत आहे. शेतकऱ्यांना पैसे देत नाही, असा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. तसेच, राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकार प्रत्येक शेतकऱ्याला पाच हजार रुपये देत असून त्यांच्यासाठी विनामूल्य पीक विम्याचीही व्यवस्था केली आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. 

याशिवाय, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करत 'भाजपाने सोनार भारत नष्ट केला आहे आता सोनार बांग्लाच्या गोष्टी करत आहेत' अशी खरमरीत टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली होती. तसेच, ज्यांनी देश विकायला काढलाय त्यांनी पश्चिम बंगालवर नजर टाकण्याअगोदर आरसा पाहायला हवा, अशी चपराकही त्यांनी भाजपाला लगावली होती.

ममता बॅनर्जी यांची केंद्र सरकारवर टीका दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका करत किसान सन्मान योजनेचा निधी अद्याप आला नसल्याचा दावा केला होता. ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना सांगितले होते की, राज्य सरकारकडून केंद्र सरकारला २.५ शेतकऱ्यांची नावे पाठवली होती. मात्र, अद्यापही पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी राज्याला मिळाला नाही. केंद्राकडून राज्य सरकारला सहा लाख अर्ज पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी २.५ लाख अर्ज शेतकऱ्यांचे आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी नमूद केले होते.

ममता बॅनर्जी सरकारने बंगालची संस्कृती संपुष्टात आणली - जेपी नड्डाभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी परिवर्तन यात्रेत संबोधित करताना ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जी सरकारने बंगालची संस्कृती संपुष्टात आणल्याचे जेपी नड्डा म्हणाले. ममता दीदी राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालचा विकास नकोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालला येतात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बंगालचा विकास होईल. आम्ही मोकळ्या हाताने येत नाही, तर प्रकल्प घेऊन येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमारे ४ हजार ७०० कोटींचे प्रकल्प बंगालला दिले, असे सांगतममता बॅनर्जींना केवळ हुकूमशाहीची चिंता असल्याचा दावा जेपी नड्डा यांनी केला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपा