शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 15:47 IST

भाजप उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ३ मुलांना चिरडले.

Brij Bhushan Singh News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद सांभाळणारे ब्रिजभूषण शरण सिंह नाना कारणांनी चर्चेत असतात. नामांकित महिला पैलवानांनी केलेले गंभीर आरोप, आंदोलनं यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. यावेळी त्यांचे भाजपाने तिकीट कापले असून त्यांच्या मुलाला लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. बुधवारी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ३ मुलांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. करण भूषण सिंह हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आहेत. 

विशेष बाब म्हणजे अपघातानंतर, करण भूषण घटनास्थळी थांबले नाही. मात्र, पोलीस स्कॉर्ट असे लिहिलेली फॉर्च्युनर कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. महत्वाचे म्हणजे, जिल्ह्यातील करनैलगंज कोतवाली भागातील  करनैलगंज हुजूरपर मार्गावर खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा आणि कैसरगंजचे भाजप उमेदवार करण भूषण यांचा ताफा हुजूरपूरच्या दिशेने जात होता. याच वेळी वैकुंठ महाविद्यालयाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन मुलांना करण भूषण यांच्या ताफ्यातील एका फॉर्च्युनर वाहनाने चिरडले.

दोन मुलांचा जागीच मृत्यू 

दरम्यान, या घटनेवर बोलण्यास प्रथमत: ब्रिजभूषण यांनी नकार दिला. मग त्यांची मुजोरी पाहायला मिळाली. माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी उत्तर न देता "तुम्ही घरी या तिथे बोलू", असे म्हटले. त्यानंतर त्यांनी कशीबशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, करण सिंह यांच्या वाहनांचा ताफा जात असताना ३-४ किमी अंतर व्यापले होते. यात अपघात झाला आणि मुलांचा मृत्यू झाला हे वेदनादायी आहे. तुम्ही माझ्या मुलाला गुन्हेगार बनवा. अपघातात मृत झालेली मुले काही महिलांशी वाद घालून आली होती. तितक्यात त्यांची ताफ्यातील वाहनाशी टक्कर झाली. या अपघाताची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल.

अपघाताच्या घटनेनंतर करण भूषण यांचा ताफा तेथे थांबला देखील नाही, ना करण भूषण यांनी उतरून मुलांची स्थिती जाणण्याचा प्रयत्न केला. ताफा मुलांना चिरडून निघून गेला आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तिसऱ्या मुलाला रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहAccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा