संक्षिप्त बातम्या.....

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:12+5:302015-02-16T23:55:12+5:30

मनपाला नोटीस

Brief news ..... | संक्षिप्त बातम्या.....

संक्षिप्त बातम्या.....

पाला नोटीस
नागपूर : कालबद्ध पदोन्नतीचा लाभ नाकारण्यात आल्यामुळे अशोक वंदे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर हायकोर्टाने राज्य शासनाचे प्रधान सचिव, मनपा आयुक्त व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. वंदे यांची १२ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे.
शिक्षिकेला दिलासा
नागपूर : हायकोर्टाने शिक्षिका रेखा कांबळे यांच्या ठेवी परत करण्याचे निर्देश नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले आहेत. तसेच बँकेविरुद्धच्या तक्रारीवर कारवाई करण्याची पोलिसांना मुभा दिली आहे. बँकेने ठेवी परत करण्यास नकार दिला होता.
सशर्त अटकपूर्व जामीन
नागपूर : हायकोर्टाने महागाव (ता. भिवापूर) येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात कार्यरत जयवंत राऊत यांना ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. राऊत यांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे लागणार आहे.
फॅन्सी नंबर प्लेटवर आज सुनावणी
नागपूर : सत्पालसिंग रेणू यांनी फॅन्सी नंबर प्लेटविरुद्ध हायकोर्टात दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे. नंबर प्लेटचा आकार, अंकांचा आकार, रंग इत्यादी संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

Web Title: Brief news .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.