गुजरातमध्ये पूल कोसळला! वाहने नदीत पडली, सहा जण वाचले, चार बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 21:19 IST2023-09-24T21:18:59+5:302023-09-24T21:19:06+5:30
सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वस्ताडी गावाजवळ हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गाला चुरायेथे जोडणारा पूल बांधण्यात आला होता.

गुजरातमध्ये पूल कोसळला! वाहने नदीत पडली, सहा जण वाचले, चार बेपत्ता
गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पूल कोसळला आहे. यामध्ये ट्रकसह अन्य काही वाहने नदीच्या पाण्यात कोसळली आहेत.
पुल कोसळल्याने १० जण वाहनांसह पाण्यात कोसळले होते. यापैकी सहा जणांना वाचविण्यात आले आहे. तर इतरांना वाचविण्यासाठी बचाव मोहिम सुरु करण्यात आली आहे. बेपत्ता लोकांची शोधमोहिम सुरु आहे.
सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वस्ताडी गावाजवळ हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गाला चुरायेथे जोडणारा पूल बांधण्यात आला होता. तो कोसळला आहे. पुलावरून जात असलेल्या ट्रक, मोटारसायकलसह अनेक वाहने नदीत पडली. त्यात प्रवास करणारे लोकही पाण्यात पडले.