शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

नाचता नाचता पुल कोसळले, नवऱ्यासह वराती गटारात पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 9:18 AM

एका कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. वराती बँड बाजाच्या तालावर उत्साहात नाचत होते. वरात मंगल कार्यालयाच्या बाहेर आली असतानाच अचानक गोंधळ माजला.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील एका कुटुंबात लग्नाची लगबग सुरू असतानाच अचानक गोंधळ माजला. नवऱ्यासह नाचत असलेले 30 ते 40 वराती छोटे पुल कोसळून गटारात पडले. हॉल मालकाने जखमींच्या इलाजाचा खर्च उटलण्याची तयारी दर्शवल्यानंतर हा गोंधळ शांत झाला.

नोएडा - उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील एका कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. वराती बँड बाजाच्या तालावर उत्साहात नाचत होते. वरात मंगल कार्यालयाच्या बाहेर आली असतानाच अचानक गोंधळ माजला. नवऱ्यासह नाचत असलेले 30 ते 40 वराती छोटे पुल कोसळून गटारात पडले. थोडा वेळ अफरातफर माजल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी शिडी लावून गटारात पडलेल्या वरात्यांना बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार न्यू कोंडली परिसरात राहणाऱ्या फूल सिंह यांच्या मुलीचा विवाह इंदिरापुरम येथील अमित यांच्याशी होणार होता. त्यासाठी त्यांनी सेक्टर 52मधील ऑलिव्ह गार्डन येथे हॉल बूक केला होता. त्यानंतर शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अमित आणि वराती बँड बाजासह मंडपाच्या बाहेर पोहोचले. मंडपाजवळ असलेल्या पुलावर वराती जोशात नाचत होते. त्यामुळे पडत असलेल्या भारामुळे कमकुवत स्लॅब कोसळले. त्यामुळे वरासह अनेक वराती गटारात पडले. या प्रकारात तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच गटारात पडल्याने अनेकांच्या सोन्याच्या अंगठ्या तसेच मोबाइल फोन हरवल्याचा दावा वर पक्षाने केला.  अखेरीस वराने कपडे बदलून विवाहाची औपचारिकता पूर्ण केली. मात्र झाल्या प्रकारामुळे वराती कमालीचे संतप्त झाले. अखेर हॉल मालकाने जखमींच्या इलाजाचा खर्च उटलण्याची तयारी दर्शवल्यानंतर हा गोंधळ शांत झाला. दरम्यान, याबाबात आतापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.  

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके