नोएडा - उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील एका कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. वराती बँड बाजाच्या तालावर उत्साहात नाचत होते. वरात मंगल कार्यालयाच्या बाहेर आली असतानाच अचानक गोंधळ माजला. नवऱ्यासह नाचत असलेले 30 ते 40 वराती छोटे पुल कोसळून गटारात पडले. थोडा वेळ अफरातफर माजल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी शिडी लावून गटारात पडलेल्या वरात्यांना बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार न्यू कोंडली परिसरात राहणाऱ्या फूल सिंह यांच्या मुलीचा विवाह इंदिरापुरम येथील अमित यांच्याशी होणार होता. त्यासाठी त्यांनी सेक्टर 52मधील ऑलिव्ह गार्डन येथे हॉल बूक केला होता. त्यानंतर शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अमित आणि वराती बँड बाजासह मंडपाच्या बाहेर पोहोचले. मंडपाजवळ असलेल्या पुलावर वराती जोशात नाचत होते. त्यामुळे पडत असलेल्या भारामुळे कमकुवत स्लॅब कोसळले. त्यामुळे वरासह अनेक वराती गटारात पडले. या प्रकारात तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच गटारात पडल्याने अनेकांच्या सोन्याच्या अंगठ्या तसेच मोबाइल फोन हरवल्याचा दावा वर पक्षाने केला. अखेरीस वराने कपडे बदलून विवाहाची औपचारिकता पूर्ण केली. मात्र झाल्या प्रकारामुळे वराती कमालीचे संतप्त झाले. अखेर हॉल मालकाने जखमींच्या इलाजाचा खर्च उटलण्याची तयारी दर्शवल्यानंतर हा गोंधळ शांत झाला. दरम्यान, याबाबात आतापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
नाचता नाचता पुल कोसळले, नवऱ्यासह वराती गटारात पडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 09:20 IST
एका कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती. वराती बँड बाजाच्या तालावर उत्साहात नाचत होते. वरात मंगल कार्यालयाच्या बाहेर आली असतानाच अचानक गोंधळ माजला.
नाचता नाचता पुल कोसळले, नवऱ्यासह वराती गटारात पडले
ठळक मुद्दे उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील एका कुटुंबात लग्नाची लगबग सुरू असतानाच अचानक गोंधळ माजला. नवऱ्यासह नाचत असलेले 30 ते 40 वराती छोटे पुल कोसळून गटारात पडले. हॉल मालकाने जखमींच्या इलाजाचा खर्च उटलण्याची तयारी दर्शवल्यानंतर हा गोंधळ शांत झाला.