१७१० कोटी रुपये खर्चून पुल बांधला, वादळ-पावसात हवेत उडाला, धक्कादायक प्रकार समोर आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 16:23 IST2022-04-30T16:23:07+5:302022-04-30T16:23:53+5:30
Bridge Collapse Bihar: बिहारमधील भागलपूर आणि खगडिया या भागांना जोडणाऱ्या फोरलेन पुलाचे सुपर स्ट्रक्चर शुक्रवारी रात्री उशिरा वादळ आणि पावसामुळे कोसळला. सुल्तानगंजच्या बाजूने पोल नंबर ४, ५ आणि सहा दरम्यान, तयार करण्यात आलेले सुपर स्ट्रक्चर कोसळले.

१७१० कोटी रुपये खर्चून पुल बांधला, वादळ-पावसात हवेत उडाला, धक्कादायक प्रकार समोर आला
भागलपूर - बिहारमधील भागलपूर आणि खगडिया या भागांना जोडणाऱ्या फोरलेन पुलाचे सुपर स्ट्रक्चर शुक्रवारी रात्री उशिरा वादळ आणि पावसामुळे कोसळला. सुल्तानगंजच्या बाजूने पोल नंबर ४, ५ आणि सहा दरम्यान, तयार करण्यात आलेले सुपर स्ट्रक्चर कोसळले. केबल लावलेले असतानाही पुलाचे सुपर स्ट्रक्चर कोसळणे हे इंजिनियरच्या कार्यपद्धतीवर प्नश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. हे स्ट्रक्चर सुमारे १०० फूटपेक्षा अधिक लांब होते. सुदैवाची बाब म्हणजे या पुलाखाली कुणी आला नाही. गंगा नदीवर या पुलाचे बांधकाम १७१०.७७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एस.पी. सिंगला कंस्ट्रक्शन लिमिटेड कंपनी या पुलाचे बांधकाम करत आहे.
हे पूल अगुवानी आणि सुल्तानगंज घाट यादरम्यान १७१०.७७ कोटी रुपये खर्चून तयार केला जात आहे. तर सुल्तानगंजच्या दिशेने पोल क्र. ४,५,६ दरम्यान, काम सुरू होते. त्यासाठी हे स्ट्रक्चर तयार करण्यात आले होते. या पुलाचे बांधकाम एसपी सिंगला कंस्ट्रक्शन लिमिटेड ही कंपनी करत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी पुलाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी सुमारे सव्वा आठच्या सुमारास हवामान अचानक बदलले. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे गरमीने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. मात्र शेती आणि फळबागांचे नुकसान झाले. तसेच जनजीवन विस्कळीत झाले.अनेक ठिकाणी घर आणि दुकानांवरील पत्रे उडाल्याच्या घटनाही घडल्या.