हृदयद्रावक! वरातीसाठी आलेल्या पाहुण्यांच्या गाडीने नवरीच्या काकांनाच चिरडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 15:39 IST2024-01-29T15:31:19+5:302024-01-29T15:39:51+5:30

लग्न मंडपात वधू आणि वर पक्षामध्ये काही कारणांमुळे वाद झाला. याचाच राग येऊन लग्नातील काही पाहुणे घरी परत जाऊ लागले.

bride uncle crushed by car in wedding painful death happiness turned into mourning auraiya | हृदयद्रावक! वरातीसाठी आलेल्या पाहुण्यांच्या गाडीने नवरीच्या काकांनाच चिरडलं अन्...

हृदयद्रावक! वरातीसाठी आलेल्या पाहुण्यांच्या गाडीने नवरीच्या काकांनाच चिरडलं अन्...

उत्तर प्रदेशातील औरैया येथे एका लग्न समारंभात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न मंडपात वधू आणि वर पक्षामध्ये काही कारणांमुळे वाद झाला. याचाच राग येऊन लग्नातील काही पाहुणे घरी परत जाऊ लागले. त्यानंतर वधूच्या काकांनाच या गाडीने चिरडलं. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

हे संपूर्ण प्रकरण बेला पोलीस स्टेशन परिसरातील झाबरा येथील आहे, जिथे 27 जानेवारी रोजी प्रमोद शाक्य यांच्या मुलीच्या लग्नाची वरात इटावा जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसवर आली होती. सर्व विधी आनंदाने पार पाडले जात होते. त्यानंतर रात्री लग्नाच्या वरातीत आलेले पाहुणे आणि लोकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर काही पाहुणे त्यांच्या गाड्या घेऊन परत घरी जाऊ लागले.

रस्त्याच्या कडेला उभे असलेले वधूचे काका मान सिंह यांना एका कारने चिरडलं. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती तात्काळ बेला पोलीस ठाण्यात देण्यात आली व रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना सीएचसीमध्ये पाठविण्यात आलं जिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सैफई येथे रेफर करण्यात आलं. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.

सध्या पोलिसांनी या घटनेस कारणीभूत असलेलं वाहन ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, चालक व त्यात बसलेले लोक घटनास्थळावरून पळून गेले. त्याचा शोध सुरू आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे.कार चालकाने वेगाने आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याने अपघात झाला, ज्यामध्ये मान सिंह शाक्य गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून कुटुंबीयांसह सीएचसीमध्ये पाठवण्यात आले. तेथून हायर सेंटर सैफई येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
 

Web Title: bride uncle crushed by car in wedding painful death happiness turned into mourning auraiya

टॅग्स :marriageलग्न