बारावीत कमी मार्क्स मिळाले म्हणून नवरदेवाने तोडलं लग्न; सासऱ्याला म्हणाला, "तुमची मुलगी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 16:11 IST2023-03-16T16:00:43+5:302023-03-16T16:11:20+5:30
वधूला बारावीत फार कमी गुण मिळाल्याचे कळल्यावर नवरदेवाने लग्नाला थेट नकार दिल्याचं समोर आलं आहे.

बारावीत कमी मार्क्स मिळाले म्हणून नवरदेवाने तोडलं लग्न; सासऱ्याला म्हणाला, "तुमची मुलगी..."
कोणतंही लग्न ठरलं की लग्नात कोणतीही अडचण येऊ नये आणि लग्नात अडथळे येऊ नयेत म्हणून दोन्ही घरातील लोक अत्यंत सावधपणे चर्चा करतात, पण तरी देखील लग्न मोडले तर वधू-वरांसोबतच दोन्ही कुटुंबांना खूप त्रास होतो. गेल्या काही वर्षांत असे अनेक विवाह पाहायला मिळाले आहेत की, छोट्या छोट्या गोष्टींवर लग्न मोडतं. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये समोर आली आहे. वधूला बारावीत फार कमी गुण मिळाल्याचे कळल्यावर नवरदेवाने लग्नाला थेट नकार दिल्याचं समोर आलं आहे.
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील तिर्वा कोतवाली परिसरात ही विचित्र घटना घडली आहे. मुलीला बारावीत चांगले गुण न मिळाल्यामुळे आपण लग्न रद्द करत असल्याचं नवरदेवाने वधूच्या वडिलांना सांगितले. पण वराच्या निर्णयानंतर वधूच्या वडिलांनी सांगितले की, वराच्या कुटुंबाने हुंडा पुरेसा नसल्याने लग्न रद्द केले. वधूच्या कुटुंबीयांनी वराची हुंड्याची मागणी परवडत नसल्याने लग्न रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे.
मुलीच्या वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. आपल्या मुलीचे सोनीचे लग्न बागनवा गावातील रामशंकर यांचा मुलगा सोनू याच्याशी ठरल्याचं वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. 4 डिसेंबर 2022 रोजी लग्नासाठीचा एक छोटासा कार्यक्रम झाला. वधूच्या वडिलांनी लग्नासाठी 60,000 रुपये खर्च केले.
नवरदेवासाठी 15,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी देखील घेतली होती. काही दिवसांनी वराच्या कुटुंबीयांनी हुंड्याची मागणी केली. अधिक हुंडा घेऊ शकत नाही हे वधूच्या वडिलांकडून ऐकल्यानंतर, वराने तिच्या बारावीच्या निकालावर असमाधानी असल्याचे सांगून लग्न रद्द केले. तसेच होणाऱ्या जावयाने सासऱ्याला तुमची मुलगी शिक्षणात कमकुवत असल्याचं सांगितलं. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"