शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पंजाबमध्ये त्रिकोणी लढतीत मतविभाजन ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 03:34 IST

‘हाता’ची पकड मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न : अकाली दल, आपला फुटीची डोकेदुखी

मनीषा मिठबावकर चंदीगढ : पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांपैकी गुरुदासपूर, भटिंडा या जागा महत्त्वाच्या मानल्या जातात. हेच महत्त्व लक्षात घेत भाजपने अभिनेता सनी देओलला गुरुदासपूरमधून उमेदवारी दिली. तर भटिंडामधून भाजपचा मित्रपक्ष अकाली दलाकडून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर उभ्या आहेत. दुसरीकडे प्रतिष्ठेच्या या दोन्ही जागांवर ‘हात’ची पकड मजबूत करण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसने येथे प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.

या दोन्ही तुल्यबळ पक्षांना गेल्या वेळेप्रमाणेच तगडे आव्हान देण्यासाठी आपचीही मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, आप, अकाली दलाला लागलेल्या फुटीच्या ग्रहणामुळे विभागल्या जाणाऱ्या मतांची डोकेदुखी या दोन्ही पक्षांना आहे. शिरोमणी अकाली दल हा येथील मोठा प्रादेशिक पक्ष. गेली अनेक वर्षे येथे अकाली दल-भाजप, काँग्रेसमध्ये थेट लढत रंगत असल्याचे पाहायला मिळत होते; परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपने येथील राजकारणात उडी घेत त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. मात्र आता आप, अकाली दलातील फुटीर नेत्यांनी वेगळे पक्ष काढत तिसरी आघाडी उभी केली आहे. त्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या जागाही ठरणार निर्णायकपंजाब लोकसभा मतदारसंघातील अमृतसर हादेखील प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. सुमारे दोन दशकांहून अधिक काळ येथे भाजपची मजबूत पकड होती. २००४ ते २०१४पर्यंत येथे नवज्योतसिंग सिद्धू भाजपचे खासदार होते. मात्र, पक्षातील मतभेदानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यंदा या जागेवर काँग्रसकडून गुरजीत सिंह अलूजा, भाजचे हरदीप सिंह पुरी तर आपकडून कुलदीप सिंह धालीवाल रिंगणात आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथे आपचे डॉ. धर्मवारी गांधी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या प्रणीत कौर यांना मोठ्या फरकाने हरवले होते. त्यापूर्वी या मतदारसंघात सर्वाधिक प्रभाव हा काँग्रेसचा होता. आता आपशी फारकत घेत डॉ. गांधी पीडीएत सहभागी झाल्यामुळे काँगे्रसला ही जागा परत मिळवण्याची संधी आहे.

या मतदारसंघावर अकाली दलाचे वर्चस्व पाहायला मिळते. २००९, २०१४ अशाप्रकारे सलग दोनदा येथे अकाली दलाचे शेरसिंग घुबाया निवडून आले होते. त्यानंतर पक्षातील मतभेदामुळे आता घुबाया काँग्रेसकडून या जागेवर उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल लढणार आहेत. १९८५ नंतर एकदाही या जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही.

१९ मे रोजी मतदान जागा - (१३) अमृतसर, आनंदपूर साहेब, खडूर साहेब, गुरुदासपूर, जालंधर, पतियाला, फतेहगड, फरीदकोट, फिरोजपूर, भटिंडा, लुधियाना, संगरूर, होशियारपूर.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसAAPआप