Coronavirus In India : देशात दोघांना कोरोनाची लागण, आरोग्य मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 15:14 IST2020-03-02T15:13:17+5:302020-03-02T15:14:39+5:30

Coronavirus : कन्नूर जिल्ह्यातील असलेला हा ३६ वर्षांचा रुग्ण शुक्रवारी रात्री मलेशियातून विमामाने घरी परतला होता

Breaking: Two positive cases of nCoV19 detected. More details in the Press Release MMG | Coronavirus In India : देशात दोघांना कोरोनाची लागण, आरोग्य मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब

Coronavirus In India : देशात दोघांना कोरोनाची लागण, आरोग्य मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब

नवी दिल्ली - देशात आणखी दोन कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. नवी दिल्ली आणि तेलंगणा राज्यात हे कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून इतरांपासून पूर्ण वेगळे ठेवून उपचार करण्यात येत असलेल्या एका रुग्णाचा अर्नाकुलम वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. 

केरळमधील या रुग्णाला खरंच कोरोनाची लागण झाल्याचे अद्याप सिद्ध झाले नाही. पण, तसे सिद्ध झाले, तर जगभर धुमाकूळ घालणाऱ्या या विषाणूने घेतलेला भारतातील तो पहिला बळी ठरेल. आता, सरकारकडून देशात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक रुग्ण दिल्लीत तर दुसरा रुग्ण तेलंगणात आढळून आला आहे. दिल्ली येथे पॉझिटीव्ह आढळेला रुग्ण हा इटलीतून भारतात आलेला आहे. तर, तेलंगणातील रुग्ण हा दुबईतून आला आहे. सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थीर असून त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.   

दरम्यान, कन्नूर जिल्ह्यातील असलेला हा ३६ वर्षांचा रुग्ण शुक्रवारी रात्री मलेशियातून विमामाने घरी परतला होता. न्युमोनिया, फुप्फुसाचा तीव्र संसर्ग व उच्च मधुमेहामुळे त्याला इस्पितळात दाखल केले गेले होते. या आधीही केरळमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले तीन रुग्ण आढळले होते. ते चीनमधून आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते बरे झाले. नंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणे न आढळल्याने घरी पाठविण्यात आले. 

Web Title: Breaking: Two positive cases of nCoV19 detected. More details in the Press Release MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.