शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोटॅशियम ब्रोमेटविना तयार करणार ब्रेड

By admin | Updated: May 27, 2016 04:33 IST

बेकरीमध्ये तयार केला जाणारा ब्रेड अधिक लुसलुशीत व्हावा व त्याला मनमोहक तजेला यावा यासाठी त्याच्या पिठात मिसळल्या जाणाऱ्या ‘पोटॅशियम ब्रोमेट’ या रासायनिक संयुगाचा वापर

नवी दिल्ली : बेकरीमध्ये तयार केला जाणारा ब्रेड अधिक लुसलुशीत व्हावा व त्याला मनमोहक तजेला यावा यासाठी त्याच्या पिठात मिसळल्या जाणाऱ्या ‘पोटॅशियम ब्रोमेट’ या रासायनिक संयुगाचा वापर यापुढे स्वत:हून बंद करण्याचा निर्णय ‘आॅल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने गुरुवारी जाहीर केला.राजधानी दिल्लीच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या ३८ विविध प्रकारच्या ब्रेडपैकी ८५ टक्के ब्रेडच्या नमुन्यांमध्ये ‘पोटॅशियम ब्रोमेट’ आणि ‘पोटॅशियम आयोडेट’ हे दोन संभाव्य हानिकारक घटक आढळून आल्याचा अहवाल ‘सेटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने (सीएसई) जाहीर केला. त्यानंतर ‘फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅडर्ड्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने (एफएसएसएआय) या रासायनिक घटकाचा अन्नपदार्थांमध्ये वापर करण्यावर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयास केली. ‘पोटॅशियम ब्रोमेट’ हे मानवामध्ये कर्करोग होण्याचे संभाव्य कारण ठरू शकते, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच काढला आहे. अखिल भारतीय ब्रेड उत्पादक संघाने (एआयबीएमए) येथे पत्रपरिषदेत पोटॅशियम ब्रोमेटचा वापर थांबविणार असल्याची घोषणा केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)भारतात या घटकावर बंदी नाही. भारतात पुरविण्यात येत असलेले ब्रेडही सुरक्षित आहेत, मात्र लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती पाहता आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे हार्वेस्ट गोल्ड या ब्रेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आदिल हसन यांनी स्पष्ट केले. येत्या दोन-तीन दिवसांत सर्व बड्या कंपन्या उपरोक्त घटकांऐवजी पर्यायी रसायनांचा वापर सुरू करतील.सीएसईवर संगनमताचा आरोप...सीएसईने अहवाल थेट प्रसिद्धिमाध्यमांसमोर ठेवल्याबद्दल हसन यांनी जोरदार टीका केली. या संस्थेने अन्न नियामकाकडे जात पोटॅशियम ब्रोमेटचा वापर कमी करण्याबाबत किंवा त्यावर बंदी आणण्याची शिफारस करायला हवी होती, असे ते म्हणाले. सीएसई आणि एन्झाईम तयार करणाऱ्या कंपन्यांच्या संगनमतातून हा अहवाल समोर आणला गेला आहे. त्यामागे निश्चितच काही लोकांचे हितस्वारस्य असल्याचा आरोपही त्यांनी केला. अमेरिकेत पोटॅशियम ब्रोमेटच्या वापरावर बंदी नाही. भारतातील अन्न नियामकानेही त्याला परवानगी दिल्यामुळे हा घटक सुरक्षित असल्याचे सिद्ध होते, असेही ते म्हणाले.ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेटला पर्याय म्हणून उत्प्रेरकांचा (एन्झाईम) अथवा इमल्सीफायरचा वापर केला जाऊ शकतो. ही रसायने पोटॅशियम ब्रोमेटपेक्षा स्वस्त असली तरी त्यांचा वापर करताना दक्षता घेणे आवश्यक ठरते.