ब्राह्मण अन् बनिया माझ्या खिशामध्येच आहेत; भाजप नेते पी. मुरलीधर राव यांचे उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 13:20 IST2021-11-10T13:18:12+5:302021-11-10T13:20:01+5:30
टीकेमुळे त्यांनी आपल्या म्हणण्याचा अर्थ लोकांना कळला नाही, असे म्हणून इतरांवरच दोषारोप केले आहे.

ब्राह्मण अन् बनिया माझ्या खिशामध्येच आहेत; भाजप नेते पी. मुरलीधर राव यांचे उद्गार
भोपाळ : माझ्या एका खिशात ब्राह्मण आणि दुसऱ्या खिशात बनिया म्हणजेच वाणी आहेत, असे उद्गार भाजपचे सरचिटणीस व मध्य प्रदेशचे प्रभारी पी. मुरलीधर राव यांनी काढल्याने त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका सुरू झाली आहे. या टीकेमुळे त्यांनी आपल्या म्हणण्याचा अर्थ लोकांना कळला नाही, असे म्हणून इतरांवरच दोषारोप केले आहे.
तुम्ही कधी ब्राह्मण, तर कधी बनिया यांची भाषा करता, कधी दलित आदिवासी यांची भाषा करता आणि कधीकधी सबका साथ, सबका विकास असे म्हणता. त्यामुळे तुम्ही नेमका कोणाचा विकास करणार आहात, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ब्राह्मण व बनिया हे समाज पूर्वापार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आम्ही आता अन्य समाजांकडे लक्ष केंद्रित करीत आहोत. याचा अर्थ आम्ही ब्राह्मण व बनिया यांना वाऱ्यावर सोडले असा होत नाही. ब्राह्मण व बनिया तर माझ्या दोन खिशांमध्येच आहेत.