शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

मुलगा रडू लागला म्हणून भारतीय अधिकाऱ्याच्या कुटुंबास विमानातून उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 2:40 PM

''विमान धावपट्टीकडे जाऊ लागल्यावर कर्मचाऱ्यांपैकी एकाने अपशब्द वापरुन जर तू शांत राहिला नाहीस तर खिडकीतून बाहेर फेकेन अशी धमकी दिली व नंतर आम्हाला उतरवण्यात आले. ''

नवी दिल्ली- तीन वर्षांचा मुलगा विमानात रडू लागला म्हणून एका भारतीय अधिकाऱ्याच्या कुटुंबास ब्रिटिश एअरवेजने उतरवल्याची घटना घडली आहे. 23 जुलै रोजी ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे..ए. पी. पाठक असे या सनदी अधिकाऱ्यांचे नाव असून त्यांचे कुटुंब लंडन ते बर्लिन असा ब्रिटिश एअरवेजमधून प्रवास करत होते. या घटनेची माहिती देताना पाठक म्हणाले, 'आम्ही प्रवास करत असताना आमचा तीन वर्षांचा मुलगा रडू लागला, फ्लाइट अटेंडंटने त्याला थांबायला सांगितले आणि जर रडणे थांबवले नाही तर विमानातून उतरवू अशी धमकी दिली. काहीवेळ तो शांत झालेला नसल्याचे लक्षात आल्यावर आम्हाला विमानातून उतरवले गेले.'

ते पुढे म्हणाले, माझ्या मुलाची जागा खिडकीशेजारी होती. त्याला शांत करण्यासाठी तेथे माझी पत्नी बसली होती. तरीही तेथए जाऊन माझ्यामुलाला अटेंडंटने खडसावले. विमान धावपट्टीकडे जाऊ लागल्यावर कर्मचाऱ्यांपैकी एकाने अपशब्द वापरुन जर तू शांत राहिला नाहीस तर खिडकीतून बाहेर फेकेन अशी धमकी दिली व नंतर आम्हाला उतरवण्यात आले. यासंदर्भात तक्रार करुनही ब्रिटिश एअरवेजच्या व्यवस्थापनाने काहीही कारवाई केली नाही. यासर्व प्रकारामुळे पाठक यांना लंडनमध्येच एक रात्र राहावे लागले आणि बर्लिनला जाण्यासाठी खर्च करावा लागला. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात ते सहसचिव पदावरती कार्यरत आहेत. पाठक यांनी ब्रिटिश एअरवेजकडे तक्रार केली असून केंद्रीय हवाईउड्डाण मंत्री सुरेश प्रभू व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही पत्र लिहिले आहे.

 

टॅग्स :AirportविमानतळairplaneविमानLondonलंडन