थरारक! मुलासमोर फणा काढून कोब्रा उभा राहिला अन्...; अंगावर शहारे आणणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 14:48 IST2022-08-13T14:48:35+5:302022-08-13T14:48:48+5:30
हा नाग घराच्या बाहेरून सरपटत पुढे जात होता. त्यावेळी घरातून आई तिच्या मुलाला घेऊन बाहेर पडली.

थरारक! मुलासमोर फणा काढून कोब्रा उभा राहिला अन्...; अंगावर शहारे आणणारा Video
मांड्या - कर्नाटकातील मांड्या येथील एक व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका आईनं पोटच्या मुलाला कोब्रासारख्या खतरनाक नागापासून वाचवल्याचं दिसत आहे. अंगावर शहारे आणणारी ही घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही आई मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होती. तेव्हा घडलेला प्रकार पाहून बघणारेही काही क्षणासाठी स्तब्ध झाले.
वैद्यानाथपूर रोड येथील ही घटना आहे. हा नाग घराच्या बाहेरून सरपटत पुढे जात होता. त्यावेळी घरातून आई तिच्या मुलाला घेऊन बाहेर पडली. तेव्हा मुलगा पुढे जात होता. अचानक मुलाचा पाय सापावर पडला तेव्हा कोब्रा फणा काढून उभा राहिला. क्षणातच काही कळायच्या आत आईनं मुलाला हाताला पकडून मागे ओढलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आईनं प्रसंगावधान राखलं कारण यात थोडाही विलंब लागला असता तर कोब्रा नागाने मुलाचा चावा घेतला असता.
अंगावर काटा आणणारा व्हिडिओ, आईनं वाचवला मुलाचा जीव #SnakeAttackpic.twitter.com/G8lJWP7SyW
— Lokmat (@lokmat) August 13, 2022
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे येत आहेत. आईनं दाखवलेल्या धाडसाचं लोकांकडून कौतुक होत आहे. अलीकडेच महाराष्ट्रच्या चंद्रपूर जिल्ह्यातही अशीच घटना समोर आली होती. याठिकाणी ३ वर्षाच्या मुलीला वाचवण्यासाठी आई थेट बिबट्याशी भिडली होती. तिने बिबट्याच्या तावडीतून मुलीला सोडवलं.
ही मुलगी घराबाहेर अंगणात बसून जेवण करत होती. तेव्हा अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि फरफटत घेऊन जात असताना आईने पाहिले. तेव्हा आईने धाडसाने दांडका उचलला आणि बिबट्याच्या मागे धावली. त्यानंतर दांडक्याने बिबट्यावर हल्ला चढवला. दांडक्याचा प्रहार बिबट्याच्या तोंडावर पडताच त्याने तोंड उघडले आणि मुलगी त्याच्या जबड्यातून सुटली. तो पुन्हा हल्ला करणार तितक्यात आईनं आणखी जोराने हल्ला करत राहिली. त्यानंतर बिबट्या तिथून पळून गेला. बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी वाचली परंतु ती गंभीर जखमी झाली.