बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 20:20 IST2025-12-25T20:19:35+5:302025-12-25T20:20:12+5:30
खुद्द पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला असून, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
हरियाणातील फतेहाबाद येथे आयोजित 'खासदार खेळ महोत्सवाच्या' समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल माध्यमाने उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डांगरा गावचा युवा बॉक्सर नीरजसोबतही गप्पा मारल्या. उपस्थितांनीही या संवादाचा आनंद घेतला. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि नीरज यांच्या या संवादाचा व्हिडिओ जबरदस्त व्हयरल होत आहे.
"मी तुझ्यासारखाच...!" -
पंतप्रधान मोदींसोबत सवांसाधताना नीरज म्हणाला, "सरजी, आम्हा सर्वांकडून राम राम." यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, "नीरज, राम राम." नीरजने पुढे म्हणाला, "तुम्ही कसे आहात?" यावर पंतप्रधान मोदींनी उत्स्फूर्तपणे उत्तर दिले, "मी तुमच्यासारखाच आहे." पंतप्रधान मोदींच्या या उत्तराने क्रीडा संकुलात हशा पिकला. खुद्द पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला असून, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यावेळी 'नीरज चोप्रा'चा उल्लेख करत मोदी म्हणाले, "आपले नाव नीरज आहे, तर आपणही नीरज चोप्रा प्रमाणे व्हावे, असे तुला वाटले असेल ना?" यावर नीरज म्हणाला 'हो'. दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणाऱ्या नीरजने खेळातच आपले करिअर करण्याची आणि देशासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची इच्छाही व्यक्त केली.
संवादादरम्यान पंतप्रधानांनी नीरजला त्याच्या सरावाबद्दल विचारले. नीरजने सांगितले की, तो भारती आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग सामने पाहून प्रेरणा घेतो आणि नवीन कौशल्ये आत्मसात करतो. सरावाव्यतिरिक्त मोबाईलच्या वापराबाबत विचारले असता, नीरजने प्रांजळपणे मान्य केले की, तो कधीकधी प्रशिक्षणापूर्वी 'शॉर्ट व्हिडिओ' बघतो. या 'खासदार खेळ महोत्सवात' ग्रामीण ते संसदीय स्तरापर्यंत सुमारे ४५,००० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.