अंत:करणापासून मी शेतकऱ्यांसोबत - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 07:08 IST2021-01-02T00:40:37+5:302021-01-02T07:08:13+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तमाम भारतीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

अंत:करणापासून मी शेतकऱ्यांसोबत - राहुल गांधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तमाम भारतीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. महिनाभरापासून नवीन कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी मध्यरात्री राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी अंत:करणापासून अन्यायी शक्तींविरुद्ध मान-सन्मानाने लढा देणारे शेतकरी आणि मजुरांसोबत आहे. ज्यांना आपण गमावले आणि आपल्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले, अशा सर्वांचे त्यांनी भावपूर्ण स्मरण केले. राहुल गांधी यांनी या मुद्यांवरून सरकारवर अनेकदा टीका केली आहे. २४ डिसेंबर रोजी त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत राष्ट्रपतींची या मुद्यांवर भेट घेतली होती.