सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मिरात ४ अतिरेक्यांचा केला खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 04:29 IST2017-11-22T04:29:05+5:302017-11-22T04:29:33+5:30

श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मंगळवारी काश्मीरमध्ये दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा केला.

Border Security Force personnel killed 4 terrorists in Kashmir | सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मिरात ४ अतिरेक्यांचा केला खात्मा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मिरात ४ अतिरेक्यांचा केला खात्मा

श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मंगळवारी काश्मीरमध्ये दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा केला. कुपवाडा येथील चकमकीत एक जवान शहीद तर दोघे जखमी झाले. हंडवाराच्या मागम येथे झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तय्यबा’ या संघटनेचे तीन अतिरेकी ठार झाले. मागम येथे अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांचा शोध सुरू केल्यावर उडालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. हे तिघे पाकिस्तानी होते, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले. गेल्या आठवड्यातही ६ अतिरेकी ठार झाले होते. (वृत्तसंस्था)
या वर्षी सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये १९३हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच सुरक्षा दले व पोलिसांवर जमावाकडून दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत.

Web Title: Border Security Force personnel killed 4 terrorists in Kashmir