'बंगळुरूला बॉम्बने उडवून देऊ', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचा ईमेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 04:49 PM2024-03-05T16:49:05+5:302024-03-05T16:49:55+5:30

बंगळुरूमधील कॅफेमध्ये झालेल्या स्फोटानंतर आता संपूर्ण शहर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल कर्नाटक सरकारला पाठवण्यात आला आहे. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Bomb threat email to Karnataka Chief Minister | 'बंगळुरूला बॉम्बने उडवून देऊ', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचा ईमेल

'बंगळुरूला बॉम्बने उडवून देऊ', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना धमकीचा ईमेल

कर्नाटक सरकारला काल सोमवारी ४ मार्च रोजी बंगळुरूला बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा ईमेल आला आहे. ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली. या मेलमध्ये शनिवारी ९ मार्च बंगळुरूमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे लिहिले आहे.

ईमेलमध्ये म्हटले आहे की, हा स्फोट दुपारी २.४८ वाजता शहरात होईल, यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, गृहमंत्री आणि बंगळुरू पोलीस आयुक्त यांना लक्ष्य केले जाईल. हा ईमेल शाहिद खान नावाने आला आहे. 

नियोजित वेळेच्या 4 दिवस आधी 'भारत जोडो न्याय यात्रा' संपणार, मुंबईत INDIA आघाडीची सभा

अनेक ठिकाणी बॉम्ब ठेवण्याची धमकी

यासोबतच बस, ट्रेन, मंदिर, हॉटेल आणि अंबारी उत्सवातही बॉम्ब पेरण्यात आल्याचे धमकीमध्ये म्हटले आहे. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली. सायबर क्राइम स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. बेंगळुरू पोलीस आयुक्तांना वेगळी धमकी मिळाली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी बंगळुरू सायबर क्राइम पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. या धमकीच्या ईमेलनंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण कर्नाटकात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Web Title: Bomb threat email to Karnataka Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.