मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 18:01 IST2023-01-02T17:56:39+5:302023-01-02T18:01:17+5:30
पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ राजिंदर पार्कमध्ये बॉम्बचा शेल सापडला आहे. त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर हेलिपॅड आहे,

मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्ब आढळला
पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाजवळ राजिंदर पार्कमध्ये बॉम्बचा शेल सापडला आहे. त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर हेलिपॅड आहे, तिथे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरते. बॉम्ब मिळाल्याच्या वृत्ताने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
चंदीगड पोलिसांचे पथक, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी आले. चंडीमंदिरातील लष्करालाही माहिती देण्यात आली आहे. लष्कराचे बॉम्ब निकामी करणारे पथक येथे पोहोचले आहे.
Bomb found near Punjab CM Bhagwant Mann's house in Chandigarh; bomb squad present at the spot pic.twitter.com/qrDCnBS2IF
— ANI (@ANI) January 2, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, हा बॉम्बचा शेल राजिंद्र पार्कमधील आंब्याच्या बागेत पडून होता. हे क्षेत्र यूटीच्या अखत्यारीत येते. दुपारी काही प्रवासी येथे गेले. त्यांना बॉम्बसारखे काहीतरी दिसले. ज्याची माहिती त्यांनी तत्काळ पोलिसांना १०० क्रमांकावर दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि डीएसपीही घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी चंदीगड प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन पथकही येथे पोहोचले.
मोठा खेळ होणार, नितीश कुमारांचा उद्धव ठाकरे करणार? भाजपा नेत्यांच्या दाव्यानंतर बिहारमध्ये खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, आंब्याचे बागेमध्ये हा बॉम्बचा शेल पडला होता. सेक्टर 11 अग्निशमन केंद्रातून स्थानक प्रभारी अमरजित सिंगही परिस्थिती हाताळण्यासाठी पोहोचले. बॉम्बचा शेल सक्रिय होता. फायबर ड्रममध्ये बॉम्ब काळजीपूर्वक ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर आजूबाजूला वाळूच्या पिशव्या टाकण्यात आल्या आहेत. चंडी मंदिर आर्मीला याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर येथे काही जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.