शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं होतं लैंगिक शोषण, प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 5:54 PM

हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर 20पेक्षा अधिक अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप लावल्यानंतर आता विश्वसुंदरी प्रियंका चोप्रानं बॉलिवूडमध्येही असे प्रकार घडत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

नवी दिल्ली- हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर 20पेक्षा अधिक अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप लावल्यानंतर आता विश्वसुंदरी प्रियंका चोप्रानं बॉलिवूडमध्येही असे प्रकार घडत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. मेरी क्लेअर पॉवर ट्रिप या कार्यक्रमात प्रियंका सहभागी झाली होती. त्यावेळी तिला हार्वे वेन्स्टाइनच्या लैंगिक शोषणाबाबत प्रश्न विचारण्यात आले.ती म्हणाली, हार्वे वेन्स्टाइनच्या प्रवृत्तीची लोक सगळीकडेच आहेत. ही फक्त सेक्सपुरती मर्यादित गोष्ट नाही, खरंतर हा त्यांच्या क्षेत्रातील ताकदीचा विषय आहे. हे फक्त हॉलिवूडमधल्या हार्वे यांच्यापर्यंतच मर्यादित नाही, तर बॉलिवूडमध्येही असे प्रकार सर्रास घडत असतात. हार्वेसारखी लोक बॉलिवूडमध्येही आहेत, असंही प्रियंका म्हणाली आहे. हॉलिवूडमध्ये फक्त हार्वी वाइनश्टीन ही एकच व्यक्ती नाही, तर अशी माणसे जगभरात सापडतील. आमच्या क्षेत्रात कोणाचाही अहंकार दुखवायचा नसतो. पुरुषांचा अहंकार सांभाळला नाही तर आपलं करिअर नष्ट होईल, असे महिलांना वाटते किंवा यांना दुखावले तर ते आपल्याला क्षेत्रात एकटे पाडतील, अशी महिलांच्या मनात भीती असते. 

हॉलिवूडमधील अभिनेत्री एलिसा मिलानो हिनं माझ्यासोबतही असं घडलं आहे म्हणत #Me Too ट्विट केलं आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल झालं. या कॅम्पेनला दुनियाभरातून महिलांचा सहभाग मिळतो आहे. या कॅम्पेनला आता मुंबई पोलिसांनीही पाठिंबा दिला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करत या कॅम्पेनला पाठिंबा दिला आहे. शारीरिक शोषणाबद्दल लोक ऑनलाइन मत मांडतं आहेत. ही चांगली सुरूवात आहे. आता या तक्रारींवर आम्हाला ऑफलाइन कायदेशीर करून अजून चांगली सुरूवात करू द्या. असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे. 

कोलकाता पोलिसांनीही दिला #MeToo कॅम्पेनला पाठिंबाकाही दिवसांपूर्वी कोलकाता पोलिसांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून कॅम्पेनला पाठिंबा दिला होता. कोलकाता पोलिसांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लैंगिक शोषणाच्या विरोधात महिलांनी मजबूत व्हावं, असं म्हटलं. तसंच या मुद्द्यावर पोलीस संतप्त असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं. लैंगिक शोषणाच्या प्रत्येक तक्रारावीर कठोर पाऊलं उचलणार असून दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हंटलं आहे. महिलांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असंही कोलकाता पोलिसांनी म्हंटलं. 

काय आहे #Me Tooअभिनेत्री एलिसा मिलानो हिने शारीरिक शोषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य जगासमोर येण्यासाठी ट्विट केलं. 'आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर शारीरिक शोषण झालेल्या महिलांनी जर #Me Too लिहून स्टेटस शेअर केला, तर कदाचित स्त्रियांच्या शोषणाचा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव लोकांना होईल,' असे ट्विट तिने केलं आणि जगभरातील महिला याविषयी आपली मतं मांडू लागल्या.

भारतातही ट्रेंडिंगया कॅम्पेनमध्ये हॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्याला आलेले अनुभव शेअर केले. भारतातही हा हॅशटॅग ट्रेंड झाला. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून भारतातील अनेक मुली आपल्याला आलेले असे वाईट अनुभव लोकांसमोर मांडले.

टॅग्स :Priyanka Chopraप्रियांका चोप्राMolestationविनयभंग