Bollywood actors gather at Narendra Modi's house | नरेंद्र मोदींच्या घरी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी

नरेंद्र मोदींच्या घरी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यंक्रमाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी कला आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा मेळा जमला. यावेळी शाहरूख खान, आमिर खान यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र मोदींनी कलाकारांशी संवाद साधला. 

 उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, महात्मा गांधी हे साधेपणाचे पर्याय आहेत. त्यांचे विचार दूरदूरपर्यंत पोहोचले आहेत. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याची वेळ आली तेव्हा फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी खूप चांगले काम केले.'' दरम्यान, मोदींनी यावेळी उपस्थित कलाकारांना दांडी येथे बांधण्यात आलेले संग्रहालय आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचे आवाहन केले.   या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आमिर खानने सांगितले की, महात्मा गांधींचे विचार लोकप्रिय बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. देश आणि जगाला गांधींची पुन्हा ओळख करून दिली पाहिजे, असे मला वाटते.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bollywood actors gather at Narendra Modi's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.