शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेकडून घेणार बोफोर्सच्या तोफा

By admin | Updated: November 18, 2016 01:10 IST

३० वर्षांनंतर आता भारतीय लष्करात अमेरिकन बनावटीच्या हॉवित्झरचा तोफांचा समावेश केला जाणार आहे.

नवी दिल्ली : स्व. राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात बोफोर्स तोफा तिच्या उपयुक्ततेपेक्षा खरेदीतील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जास्त चर्चेत राहिल्या. बोफोर्स म्हणजे भ्रष्टाचार असेच अनेक वर्षे समीकरण बनले होते. मात्र ३० वर्षांनंतर आता भारतीय लष्करात अमेरिकन बनावटीच्या हॉवित्झरचा तोफांचा समावेश केला जाणार आहे. एम-७७७ हॉवित्झर तोफांची निर्मिती बीएई सिस्टीम या अमेरिकन कंपनीने केली आहे. बोफोर्स तोफाची निर्मिती करणारी स्विडीश कंपनी आता बीएईच्या नियंत्रणाखाली आहे. पुढील वर्षी जून महिन्याच्या मध्यावर लष्कराच्या ताफ्यात पहिली १५५ एमएम हॉवित्झर तोफ दाखल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १४५ एम-७७७ हॉवित्झर तोफांच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा व्यवहार ५ हजार कोटी रुपयांचा आहे.त्यासाठी पेंटागॉनचे पत्र भारताला मिळाले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन आठवडयांमध्ये यासंबंधी करार होण्याची शक्यता आहे. भारतात महिंद्रा कंपनी ही बीएईची व्यावसायिक भागीदार असणार आहे. करार झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात दोन होवित्झर तोफा दिल्या जातील. त्यानंतर दर महिन्याला दोन तोफा मिळतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)