श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 19:16 IST2025-05-02T19:14:28+5:302025-05-02T19:16:27+5:30
Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे असलेल्या दल सरोवरामध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज संध्याकाळी येथील प्रसिद्ध असलेली एक शिकारा बोट वेगवान वाऱ्यांमुळे उलटली. त्यामुळे काही पर्यटक सरोवरात पडले.

श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे असलेल्या दल सरोवरामध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज संध्याकाळी येथील प्रसिद्ध असलेली एक शिकारा बोट वेगवान वाऱ्यांमुळे उलटली. त्यामुळे काही पर्यटक सरोवरात पडले. या दुर्घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये पाण्यात पडलेले पर्यटक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसत आहेत. दरम्यान, दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक लोक आमि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र शिकारामध्ये किती लोक होते आणि किती बुडाले, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, दल सरोवरात झालेल्या दुर्घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सरोवराच्या कडेला लोक मोठ्या प्रमाणावर उभे असलेले दिसत आहेत. तर सरोवरामध्ये एक शिकारा उलटलेली दिसत असून, अनेक लोक जीव वाचवण्यासाठी पाण्यात हातपाय मारताना आणि मदतीसाठी याचना करताना दिसत आहेत.