शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

'माझ रक्त सळसळतय, शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 21:21 IST

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात जवळपास 40 जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्यातील शहीद जवानांना माजी लष्कर प्रमुख आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच अशा घटनानंतर नेहमीच माझं रक्त सळसळत. या जवानांच्या रक्ताच्या एक एक थेंबाचा बदला घेतला जाईल, असेही व्ही.के. सिंग यांनी म्हटल आहे. 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येताच, त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची माहिती आहे. जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण शोकसागरात बुडाला आहे. तसेच जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, अशी भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या उरीप्रमाणेच या हल्ल्याचाही बदला घेण्याची मागणी करण्यात येत आहे. लष्कराने त्या हल्ल्याला मिशन 'सर्जिकल स्ट्राईक' हे नाव दिले होते. या मिशनअंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर, भारतीय सैन्याची ताकत जगभरातील देशांनी अनुभवली. त्यामुळे, आताही उरीप्रमाणेच अवंतीपुरा हल्ल्याचाही बदला घ्या, अशी भावना नेटीझन्स व्यक्त करत आहेत. तर, आणखी एक सर्जिकल स्ट्राईक होऊन जाऊ द्या अशी मागणीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करताना दिसत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवरुन नेटीझन्सने या हल्ल्याचा बदला हीच शहीदांना श्रद्धांजली असल्याचं म्हटलंय.      

टॅग्स :VK Singhव्ही के सिंगTerror Attackदहशतवादी हल्लाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाDeathमृत्यू