लाखो मातांचे आशीर्वाद हीच माझी शक्ती, यंदा आईचे दर्शन राहिलेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 06:14 IST2022-09-18T06:13:03+5:302022-09-18T06:14:41+5:30
मला जास्त आठवत नाही; पण सुविधा असली आणि काही कार्यक्रम नसला तर या दिवशी माझ्या आईकडे जाण्याचा, आईच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याचा माझा प्रयत्न असतो

लाखो मातांचे आशीर्वाद हीच माझी शक्ती, यंदा आईचे दर्शन राहिलेच
शेवपूर : लाखो मातांचे आशीर्वाद हीच माझी शक्ती व प्रेरणा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केले. शनिवारी सकाळी जिल्ह्यातील कराहल येथील मॉडेल स्कूलच्या मैदानावर मोदी यांनी महिला स्वयंसेवी समूहाच्या एका संमेलनास संबोधित केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्या वाढदिवसाची आठवण येथे काढली गेली.
मला जास्त आठवत नाही; पण सुविधा असली आणि काही कार्यक्रम नसला तर या दिवशी माझ्या आईकडे जाण्याचा, आईच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याचा माझा प्रयत्न असतो. आज मी आईकडे जाऊ शकलो नाही. परंतु, मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील गावागावांत मेहनत करणाऱ्या लाखो माता मला आशीर्वाद देत आहेत. मोदी म्हणाले की, लाखो मातांनी मला आशीर्वाद दिला, हे दृश्य माझ्या आईने पाहिले तर तिला नक्कीच संतोष वाटेल. समाधान वाटेल. तुमचा आशीर्वाद आम्हा सर्वांसाठी फार मोठी शक्ती, ऊर्जा आणि प्रेरणा आहे.