शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिल्लीतील विधानसभा निवडणूकीत तेरा जागांसाठी भाजपची खास रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 03:05 IST

चुरशीची लढत होणार

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : मतदानाला अवघे चार दिवस बाकी असताना राजकीय पक्ष आपापले दावे करीत आहेत; परंतु आकडेवारी पाहता दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दरवेळी बारा जागांवर चुरशीची लढत होते. जय-पराजयात फारसे अंतर नसते. सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने या जागा महत्त्वाच्या असतात. मागच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळविला होता. या निवडणुकीत फक्त चार-पाच जागांवर पाच हजारांहून कमी मतांनी उमेदवार जिंकले होते.

मागच्या निवडणुकीत १५०० ते १२ हजार मतांच्या फरकाने भाजपला विजय मिळाला आणि पराभव स्वीकारावा लागला अशा १३ जागांसाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत २३ जागांचा फैसला पाच हजारांपेक्षाही कमी मतांनी झाला होता. यापैकी पाच जागांवर मतांतील फरक एक हजारांहूनही कमी होता.

२००८ च्या निवडणुकीतही अशीच स्थिती होती. त्यावेळी जवळपास २५ जागांवर पाच हजारांपेक्षा कमी मतांनी उमेदवार विजयी झाले होते. भाजप दिल्ली प्रदेशच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत १३ जागांचा फैसला दोन हजारांपेक्षा कमी मतांनी झाला. यापैकी पाच जागांवर मतांचा फरक एक हजारपेक्षाही कमी मतांचा होता. यापैकी तीन जागांवर ५०० मतांचा फरक होता. यावेळी या जागांसाठी चुरशीची लढत होत आहे.

खेळ आकड्यांचा

आर. के.पुरम मतदारसंघातून आम आदमी पार्टीचा उमेदवार ३२६ मतांनी पराभूत झाला होता. दिल्ली छावणी मतदारसंघात ‘आप’ने भाजपला ३५५ मतांनी पराभूत केले होते. विकासपुरी, संगम विहार आणि सदर बाजार मतदारसंघात भाजपला ४०५ ते ७९६ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.२०१३ च्या निवडणुकीत मादीपूर, सुलतानपूर माजरा या जागांचा फैसला ११०० मतांनी झाला होता.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल