शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चकित करणारी बातमी; आजही झोपडीत राहतो भाजपाचा 'हा' आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 14:09 IST

एखादा आमदार म्हटला की त्याचा आलिशान बंगला, महागड्या गाड्यांचा ताफा आदी आपल्या नजरेसमोर येते. मात्र मध्य प्रदेशमध्ये असा एक आमदार आहे ज्याच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्याने तो झोपडीत राहतो.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमध्ये असा एक आमदार आहे ज्याच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्याने तो झोपडीत राहतोसीताराम आदिवासी असे या आमदाराचे नाव आहे डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयपूर मतदारसंघातून सीताराम काँग्रेसचे बलाढ्य नेते रामनिवास रावत यांना पराभूत करून निवडून आले आहेत

भोपाळ - राजकारण्यांकडे असलेली अमाप संपत्ती हा आपल्या देशातील चर्चेचा आणि ईर्षेचा विषय. साध्या सरपंचापासून आमदार, खासदारांपर्यंत बहुतांश राजकारण्यांकडे गडगंज संपत्तीचा संचय झालेला असतो. एखादा आमदार म्हटला की त्याचा आलिशान बंगला, महागड्या गाड्यांचा ताफा आदी आपल्या नजरेसमोर येते. मात्र मध्य प्रदेशमध्ये असा एक आमदार आहे ज्याच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्याने तो झोपडीत राहतो. सीताराम आदिवासी असे या आमदाराचे नाव असून, डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयपूर मतदारसंघातून ते काँग्रेसचे बलाढ्य नेते रामनिवास रावत यांना पराभूत करून निवडून आले आहेत. सीताराम यांनी तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. याआधी दोनवेळा त्यांना अपयश आले होते. मात्र यावेळी त्यांनी विजयश्री खेचून आणली. मात्र राजकारणात एकढी वर्षे सक्रिय राहिल्यानंतरही सीताराम यांच्याकडे राहण्यासाठी अद्याप पक्के घर नाही. ते एका झोपडीसदृश घरात अजूनही राहतात. दरम्यान, सीताराम यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने परिसरातील नागरिकांनी निधी उभारून त्यांना घर बांधून देण्याची तयारी केली आहे. आपला आमदार झोपडीत राहतो, ही बाब योग्य न वाटल्याने आम्ही त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतल्याचे स्थानिक सांगतात. आमदार झाले असले तरी सीताराम यांचे राहणीमान अद्यापही ग्रामीण व्यक्तीला साजेसे आहे. ''माझ्याकडे पैसे नसल्याने मी पक्के घर बांधू शकत नाही. एकेकाळी मी काँग्रेसचा सदस्य होतो. मात्र तिथे मला पुरेसे महत्त्व मिळाले नाही. त्यामुळे मी भाजपामध्ये आलो. दोन निवडणुकीत पराभव झाला. मात्र तिसऱ्या वेळी मला विजय मिळाला.'' असे सीताराम सांगतात. सीताराम हे आमच्यासाठी नेहमीच संघर्ष करतात. जिथे गरज असेल तिथे न डगमगता सोबत येतात. त्यामुळेच आमदार आमच्यामध्येच राहावेत, असे आम्हाला वाटते. म्हणूनच आम्ही त्यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला, असे एका स्थानिकाने सांगितले. तर सीताराम यांची पत्नी इमरती बाई सांगते की, आम्ही अनेक वर्षे संघर्ष केला. आता दिवस बदलले आहेत. आतातरी आमची आर्थिक परिस्थिती सुधारून जीवन सुखी होईल, असे वाटते.  

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारPoliticsराजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेश