शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या 'न्याय'नंतर भाजपाचे काय?; लोकसभा निवडणुकीसाठी आज जाहीर होणार 'संकल्पपत्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 09:04 IST

आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध करणार आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याचे नाव ‘संकल्पपत्र’ असे दिले आहे.

ठळक मुद्देभाजपा आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध करणारनवी दिल्लीतील भाजपा कार्यालयात हा जाहीरनामा होणार प्रसिद्ध गेल्या 2 एप्रिल रोजी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

नवी दिल्ली: आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध करणार आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्याचे नाव ‘संकल्पपत्र’ असे दिले आहे. नवी दिल्लीतील भाजपा कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत.

भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. यासाठी देशभरातून जवळपास 7500 सूचना पेट्या, 300 रथ आणि इलेक्ट्रानिक माध्यमांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार भाजपाने हा जाहीरनामा तयार केला आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकरी आणि तरुण वर्गासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच या संकल्पपत्रात रोजगार निर्मितीबाबत पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, गेल्या 2 एप्रिल रोजी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली आहे. 

फिर एक बार, मोदी सरकार; भाजपाकडून टॅगलाईनची घोषणागेल्या लोकसभा निवडणुकीतील अब की बार मोदी सरकार ही भाजपाची घोषणा अतिशय गाजली होती. आता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने नवी घोषणा दिली आहे. फिर एक बार, मोदी सरकार, असे म्हणत यंदा भाजपाकडून पुन्हा एकदा मोदींच्या हाती सत्ता देण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. 

अब होगा न्याय! लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची टॅगलाईनकाँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्याय योजनेला केंद्रस्थानी ठेवत 'अब होगा न्याय' घोषणा दिली आहे.  किमान उत्पन्न योजनाच काँग्रेसच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल, हे या घोषणेतून काँग्रेसने अधोरेखित केले आहे. 25 मार्च रोजी पत्रकार परिषद घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी न्याय योजनेची घोषणा केली होती. यानंतर गेल्याच आठवड्यात राहुल गांधींनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यातही न्याय योजनेवरच भर देण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना न्याय देण्यात येईल, असे राहुल गांधींनी म्हटले होते. 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस